14 December 2019

News Flash

व्हिडिओः बराक ओबामा आणि मिशेल यांना १०६ वर्षांच्या महिलेने नाचविले!

लहान मुलांमध्ये जसा उत्साह आणि जोश असावा तसा वर्जीनिया यांच्यात तो दिसून येत होता.

अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर खूप गाजत आहे. बराक ओबामा यांना भेटण्यास गेलेल्या १०६ वर्षांच्या महिलेच्या नृत्यामुळे हा व्हिडिओ सर्वांचेच लक्ष वेधत आहे. व्हाइट हाऊसने रविवारी त्यांच्या फेसबुक पेजवर हा व्हिडिओ प्रसिद्ध केला.
वर्जीनिया मैक्‍लॉरेन या १०६ वर्षीय महिलेने त्यांच्या जन्मदिनी बराक ओबामा आणि मिशेल ओबामा यांची व्हाइट हाउस येथे भेट घेतली. आपल्या देशाच्या अध्यक्षांना आणि त्यांच्या पत्नीला भेटणार असल्याने वर्जीनिया या फार उत्साहात होत्या. अगदी लहान मुलांमध्ये जसा उत्साह आणि जोश असावा तसा वर्जीनिया यांच्यात तो दिसून येत होता. ओबामा स्वतः वर्जीनिया यांचा हात पकडून त्यांना घेऊन आले आणि या तिघांनी डान्स केला. ओबामांची भेट घेतल्यानंतर खूष झालेल्या वर्जीनिया म्हणाल्या की, मी कृष्णवर्णीय आहे आणि तुम्हीदेखील तसेच आहात. हाच कृष्णवर्णीय इतिहास साजरा करण्यासाठी मी येथे आले आहे. मला आज किती आनंद झाला आहे ते मी तुम्हाला सांगू शकत नाही.

First Published on February 23, 2016 5:21 pm

Web Title: meet the 106 year old who got to dance with the president and the first lady
टॅग Barack Obama
Just Now!
X