News Flash

मेहुल चोक्सी माझ्या घरी आला होता, हॉटेलमध्ये राहण्याचीही दिली होती ऑफर; जराबिकाचा गौप्यस्फोट

आपण मेहुल चोक्सीची गर्लफ्रेंड नसल्याचं सांगत बारबरा जराबिकाने मेहुल चोक्सीबद्दल अनेक खुलासे केले...

आपण मेहुल चोक्सीची गर्लफ्रेंड नसल्याचं सांगत बारबरा जराबिकाने मेहुल चोक्सीबद्दल अनेक खुलासे केले... (संग्रहित छायाचित्र)

पंजाब नॅशनल बँकेत कर्ज घोटाळा करून फरार झालेला मेहुल चोक्सी पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला आहे. भारतातून फरार झाल्यानंतर चोक्सीने गेल्या काही महिन्यापासून अँटिग्वामध्ये मुक्काम ठोकला होता. मात्र, तिथूनही तो पसार झाला होता. डोमिनिकामध्ये चोक्सीला अटक करण्यात आली. त्यानंतर त्याने आपलं अपहरण झाल्याचं दावा केला होता. यात गर्लफ्रेंड म्हणून चर्चेत आलेल्या बारबरा जराबिकावर त्याने आरोप केला होता. होत असलेले आरोप आणि चोक्सीसोबत संबंध असल्याच्या सगळ्या प्रकरणावर जराबिकाने खुलासा केला आहे.

इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखती बारबरा जराबिकाने मेहुल चोक्सीबद्दल गौप्यस्फोट केला आहे. कर्जबुडव्या मेहुल चोक्सीच्या अपहरणात आपला कोणत्याही प्रकारे सहभाग नसल्याचंही जराबिकाने स्पष्ट केलं आहे. मेहुल चोक्सी आपल्याला मागच्या वर्षी अँटिग्वाच्या भेटीदरम्यान भेटला होता आणि त्याने स्वतःची ओळख राज म्हणून करून दिली होती. त्याच्यासोबत मी कॉफी घेण्यासाठी, कधी सायंकाळी फिरायला जायचे, तर कधी रात्रीचं जेवण सोबत करायचो, असं जराबिकाने म्हटलं आहे.

“चोक्सी माझ्या घरी आला होता. मी नेहमीच हे रिलेशन फक्त मैत्री आणि व्यवसायापुरतं ठेवण्याचीच माझी इच्छा होती, पण तो नेहमीच मला हॉटेलमध्ये राहण्याची आणि विमानाचे तिकीट बुक करण्याची ऑफर देत राहिला. यात अपेक्षा ठेवल्या जाणार असल्याने मी या ऑफर नाकारल्या. त्यानंतर त्याने रिलेशनशिपबद्दल गैरसमज करून घेतला,” असं जराबिकाने म्हटलं आहे.

Photos : मेहुल चोक्सीच्या गर्लफ्रेण्डचे फोटो आले समोर; डिनर डेटला गेलेला असतानाच झाली अटक

“मे महिन्यात परिस्थिती बदलली. त्याने त्याच्यासोबत व्यवसाय करण्याची ऑफर दिली. मी प्रॉपर्टीशी संबंधित काम करत असल्याचं माहिती असल्याने तो सोबत काम करण्याची ऑफर देत राहिला. त्याला अँटिग्वामध्ये हॉटेल, क्लब सुरू करायचे होते आणि त्याने सांगितलं की, यासाठी तो पैसा पुरवेल. त्यामुळेच त्याने व्यवसाय करण्यास इच्छा दाखवली,” असंही जराबिकाने म्हटलं आहे.

“…नंतर त्याने फ्लर्ट करायला सुरुवात केली”

“मी चोक्सीची मैत्रीण होते. माझ्याशी भेटल्यानंतर चोक्सीने स्वतःची राज म्हणून ओळख करून दिली होती. गेल्या वर्षी मी अँटिग्वात असताना चोक्सीने मला भेटला होता. आमच्या मैत्री झाली आणि नंतर त्याने फ्लर्ट करायला सुरुवात केली. त्याने मला डायमंड रिंग आणि ब्रेसलेट गिफ्ट म्हणून दिलं होतं. जे की बनावट असल्याचं नंतर आढळून आलं,” असं जराबिका म्हणाली.

Explained : मेहुल चोक्सीच्या कथित गर्लफ्रेंडचं गूढ! नक्की कोण आहे बारबरा जराबिका? चोक्सीचं खरंच अपहरण झालं?

मी आणि माझं कुटुंब तणावात

डोमिनिकामध्ये पोलिसांनी अटक केल्यानंतर चोक्सीने अपहरण झाल्याचा दावा केला होता. त्याच्या वकिलानीही याला दुजोरा दिला होता. यात प्रकरणात चोक्सीची गर्लफ्रेंड बारबरा जराबिकाचं नाव घेतलं होतं. तिचा यात हात असल्याचा आरोपही करण्यात आला. हे सर्व आरोप जराबिकाने फेटाळून लावले आहेत. “चोक्सीच्या अपहरणात आपला कसलाही सहभाग नाही. मेहुल चोक्सीच्या वकिलांकडून आणि त्याच्या कुटुंबियांकडून यात माझं नाव जबरदस्ती घेतलं जात आहे. यामुळे मी आणि माझं कुटुंब सध्या तणावाखाली जगत आहे,” असंही जराबिकाने म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2021 9:39 am

Web Title: mehul choksi girlfriend barbara jarabica mehul choksi news barbara jarabica interview bmh 90
Next Stories
1 निर्मला सीतारमण यांनी जाहीरपणे सुनावल्यानंतर इन्फोसिसचं आश्वासन; म्हणाले…
2 उत्तर प्रदेश : बस आणि टेम्पोच्या भीषण अपघातात १७ जणांचा मृत्यू; मोदी-योगींनी जाहीर केली मदत
3 PM Modi changed Covid vaccine policy : लसवाटपाचे नवे धोरण
Just Now!
X