26 May 2020

News Flash

बुध ग्रहाचे सोमवारी अधिक्रमण

पृथ्वीवरून पाहताना बुध ग्रह जेव्हा सूर्यबिंबावरून जाताना दिसतो, त्याला ‘बुध ग्रहाचे अधिक्रमण’ असे म्हणतात.

 

उत्तर अमेरिका, ओसेनिआ, न्यूझीलंडमधून निरीक्षणाची पर्वणी

येत्या सोमवारी बुध ग्रह हा सूर्यबिंबावरून अधिक्रमण करणार आहे. मात्र, हे अधिक्रमण भारतामध्ये दिसणार नसून केवळ उत्तर अमेरिका, ओसेनिआ आणि न्यूझीलंड या देशांमध्येच दिसणार असल्याची माहिती खगोल अभ्यासक आणि पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली. तसेच अशा प्रकारचे अधिक्रमणचा योग तेरा वर्षांनंतर पुन्हा येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पृथ्वीवरून पाहताना बुध ग्रह जेव्हा सूर्यबिंबावरून जाताना दिसतो, त्याला ‘बुध ग्रहाचे अधिक्रमण’ असे म्हणतात. बुध ग्रहाप्रमाणेच शुक्राचे अधिक्रमणही पृथ्वीवरून दिसते. बुधाचे अधिक्रमण मात्र दुर्बिणीतून पहावे लागते. सूर्यग्रहणात जसे चंद्रबिंब सूर्यबिंबावरून जाताना दिसते, तसाच हा प्रकार असतो, असे सोमण यांनी सांगितले.

यापूर्वी ९ मे २०१६ रोजी बुध ग्रहाचे अधिक्रमण झाले होते. त्यानंतर आता येत्या ११ नोव्हेंबर रोजी बुधाचे अधिक्रमण होत आहे. हे अधिक्रमण भारतातून दिसणार नाही. दक्षिण आशिया, यूरोप, आफ्रिका, दक्षिण ग्रीनलँड, अंटाक्र्टिका, दक्षिण अमेरिका, अलास्का सोडून उत्तर अमेरिका, ओसेनिआ आणि न्यूझीलंड येथून हे अधिक्रमण दिसणार आहे. त्यामुळे तेथील खगोलप्रेमींसाठी अधिक्रमण निरीक्षणाची पर्वणी असणार आहे. तेरा वर्षांनी म्हणजेच १३ नोव्हेंबर २०३२ रोजी असा योग पुन्हा येणार आहे. शुक्राचे अधिक्रमण ६ जून २०१२ रोजी झाले होते. यानंतर ते ११ डिसेंबर २११७ रोजी दिसेल, असे त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 9, 2019 1:17 am

Web Title: mercurys orbit of mercury on monday akp 94
Next Stories
1 अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी
2 बंदूकधारकांची संख्या दुप्पट
3 तीन हात नाका आक्रसला!
Just Now!
X