News Flash

धक्काही न लावता ATM मधून लाखो लुटले, दरोडेखोरांची शक्कल वाचलीत तर तुम्हीही चकित व्हाल!

चेन्नईतील एटीएममध्ये चोरीची घटना उघडकीस आली असून यामुळे पोलिसांसह बँक व्यवस्थापनालाही आश्चर्य वाटत आहे.

SBI ने खातेधारकांसाठी नियम बदलले

लॉकडाऊनमध्ये चोरीच्या घटनांमध्ये अचानक वाढ झाली आहे. चेन्नईतील एटीएममध्ये चोरीची घटना उघडकीस आली असून यामुळे पोलिसांसह बँक व्यवस्थापनालाही आश्चर्य वाटत आहे. चोरांनी चेन्नईतील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वेगवेगळ्या एटीएममधील डिपॉझिट मशीनमधून अत्यंत हुशारीने ३५ लाखाहून अधिक रोख रक्कम चोरून नेली.

पैसे बाहेर येताच चोराने मशीनमध्ये आपले बोट अडकवले, त्यामुळे कॅश काढण्याचे सेक्शन काम करत नव्हते आणि जाग्यावर थांबले. त्यानंतर चोरांनी एटीएम कार्ड टाकून १० हजार रूपये काढण्याचा प्रयत्न केला. पैसे बाहेर येताच, त्यानंतर त्यांनी अनेकदा पैसे काढले. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये चोरीची नवीन पद्धत घडली. पोलिसांना या दरोडेखोरांचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून त्या आधारे त्यांचा शोध घेतला जात आहे.

हेही वाचा- दिल्ली: भिंतीला भगदाड पाडून बॅंकेवर दरोडा; ५५ लाखाची चोरी

अनेक ठीकाणी आल्या चोरीच्या तक्रारी

सेनॉय नगर येथील एसबीआय बँकेच्या शाखेचे व्यवस्थापक विरुगमबक्कम पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, चोर एटीएममध्ये जाऊन पैसे काढत होते. व्यवहार झाल्यानंतर एटीएममधून पैसे निघत असतांना चोर पैसे निघणाऱ्या जाग्यावर बोट ठेवत होते. इलेक्ट्रॉनिक उपकरण असल्याने व्यवहार रद्द होतं असत. त्यानंतर चोर पसै काढत होते. अशी प्रक्रिया चोर पुन्हा पुन्हा करत होते.

चोरीची नवीन पद्धत उघडकीस आल्यानंतर एसबीआय बँकेच्या अनेक शाखांच्या व्यवस्थापकांनी संबंधित पोलीस ठाण्यात तक्रारी केल्या आहेत. रामपुरम-वल्लुवर रोड, वेलचेरी- विजयनगर, तारामणी, पेरियामेदू येथे एटीएम चोरीची घटना समोर आली आहे. अनेक एटीएममधून बदमाश्यांनी ३५ लाख रुपये चोरले.

लोकं अनेकदा डिपॉझिट मशीनमध्ये पैसे जमा करतात. मात्र, यातून रोख रक्कमही काढता येते हे फार कमी लोकांना माहित असते. या माहितीचा फायदा घेत चोरांनी चोरी केली आहे. यांनी एसबीआयच्या डिपॉझिट मशीनवर जाऊन आणि डिपॉझिट मशीनमधून त्यांच्या एटीएम कार्डचा वापर करुन पैसे चोरी केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 22, 2021 5:47 pm

Web Title: millions robbed from atm you will be amazed if you read about robbers srk 94
टॅग : Crime News,Robbery
Next Stories
1 CBSE, ICSE 12th Exams : परीक्षा रद्दच, सुप्रीम कोर्टानं केलं शिक्कामोर्तब!
2 तिसर्‍या टप्प्यात भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ७७.८ टक्के प्रभावी; केंद्राकडे माहिती सादर
3 जेट एअरवेज पुन्हा उडणार! NCLT ने स्वीकारला कारलॉक-जालनचा प्रस्ताव
Just Now!
X