News Flash

धोक्याचा इशारा: भारतात दररोज आढळतील २ लाख ८७ हजार करोना रूग्ण

भारतात करोना महामारी गंभीर रुप धारण करण्याची शक्यता

संग्रहित (PTI)

करोनावर लवकरात लवकर लस सापडली नाही तर भारतात करोना महामारी गंभीर रुप धारण करण्याची शक्यता आहे. मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीकडून (एमआयटी) करण्यात आलेल्या अभ्यासात हा अंदाज दर्शवण्यात आला आहे. या अभ्यासानुसार, फेब्रुवारी २०२१ अखेरपर्यंत भारतात दिवसाला २ लाख ८७ हजार करोनाबाधित रुग्णांची नोंद होईल असं सागंण्यात आलं आहे. ८४ देशांमधील टेस्टिंग आणि केस डेटाच्या आधारे हा अभ्यास कऱण्यात आला. यामध्ये जगभरातील एकूण ६० टक्के लोकसंख्येचा समावेश करण्यात आला होता.

एमआयटीचे संशोधक हाजहीर रहमानदाद, टी वाय लिम आणि जॉन स्टेरमन यांनी हा अभ्यास केला आहे. यासाठी त्यांनी साथीचा रोग विशेषज्ञांकडून वापरण्यात येणाऱ्या SEIR (Susceptible, Exposed, Infectious, Recovered) या मॉडेलचा वापर केला. या अभ्यासानुसार उपचार उपलब्ध न झाल्यास २०२१ मधील मार्च-मे महिन्यात जगभरातील करोनाबाधितांची संख्या २० ते ६० कोटी दरम्यान असेल.

या अभ्यासानुसार, फेब्रुवारी २०२१ च्या अखेरीस करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांच्या यादीत भारत पहिल्या क्रमांकावर असेल. यानंतर अनुक्रमे अमेरिका, दक्षिण आफ्रिका आणि इऱाणचा समावेश असेल. अमेरिकेत दिवसाला ९५ हजार, दक्षिण आफ्रिकेत २१ हजार आणि इराणमध्ये १७ हजार रुग्णांची नोंद होईल असा अंदाज आहे.

हा अभ्यास करताना तीन मुख्य गोष्टींचा आधार घेण्यात आला आहे. पहिली म्हणजे सध्याचं टेस्टिंगचं प्रमाण आणि त्याला मिळणारा प्रतिसाद, दुसरी म्हणजे जर १ जुलै २०२० पासून टेस्टिंगमध्ये दिवसाला ०.१ टक्क्यांनी वाढ करण्यात आली. तिसरा आधार म्हणजे जर टेस्टिंग चालू स्तरावर कायम ठेवली परंतु संपर्क दर 8 वर गेला तर… म्हणजे एका व्यक्तीमुळे आठ लोकांना संसर्ग होणे.

या मॉडेलमध्ये करोनाचा फैलाव रोखण्यासाठी लवकरात लवकर आणि आक्रमकपणे टेस्टिंग करण्याकडे लक्ष वेधण्यात आलं आहे. उशिरा टेस्टिंग करणं आणि कमी वेगाने करणं धोकादायक ठरु शकतं असंही सांगण्यात आलं आहे. टेस्टिंगमध्ये दिवसाला ०.१ टक्क्यांनी वाढ केल्यास रुग्णसंख्या कमी होत जाईल असं अभ्यासात सांगण्यात आलं आहे.

महत्त्वाचं म्हणजे एमआयटीने जगभरातील करोनाबाधितांसंबंधीची आकडेवारी योग्यपणे दिली नसल्याचं म्हटलं आहे. “जगभरात एकूण ८ कोटी ८५ लाख लोकांना करोनाची लागण झाली असून १८ जून २०२० पर्यंत एकूण सहा लाख मृत्यू झाल्याचा आमचा अंदाज आहे,” असा दावा करण्यात आला आहे. जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीनुसार, १८ जूनपर्यंत जगभरातील करोनाबाधितांची संख्या ८ कोटी २४ लाख असून ४ लाख ५४ हजार ६१० जणांचा मृत्यू झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 8, 2020 10:35 am

Web Title: mit study reveals india might see 2 87 lakh covid cases per day by february 2021 sgy 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 चिंताजनक! भारतात सलग सहाव्या दिवशी २० हजारापेक्षा जास्त करोनाबाधित रुग्णांची नोंद
2 सद्गुरूंची चित्राच्या माध्यमातून बैलाला श्रद्धांजली; लिलावात पाच कोटींची बोली
3 धक्कादायक! पगार मागितला म्हणून मालकीणीने कर्मचाऱ्याच्या अंगावर सोडला कुत्रा, तोंडावर १५ टाके
Just Now!
X