करोनाचं संकट देशावर ओढवलं आहे. त्यामुळे मोदी सरकारने १४ दिवसांसाठी लॉकडाउनचा निर्णय घेतला. यामुळे हातावरच पोट असणाऱ्यांचे हाल सुरु झाले. हे हाल होऊ नयेत म्हणून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज गोरगरीबांसाठी १ लाख ७० हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं. एकही गरीब माणूस उपाशी पोटी झोपणार नाही यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत असंही त्या म्हणाल्या. १ लाख ७० हजार कोटींच्या पॅकेजमध्ये गरीब, कामगार वर्ग, ज्येष्ठ नागरिक, रोहयोचे कामगार, दिव्यांग, दारिद्र्यरेषेखालील महिला या सगळ्यांसाठी तरतुदी करण्यात आल्या आहेत. कुणाला काय मिळालं? जाणून घ्या या व्हिडीओच्या माध्यमातून