सनासुदीच्या काळात सोनं खरेदी करण्याचा लोकांचा कल लक्षात घेऊन मोदी सरकारने सार्वभौम सुवर्ण रोखे योजनेला सुरूवात केली होती. यंदा पाच टप्यात तुम्ही सरकारकडून सोनं खरेदी करू शकता. या योजनेचा पहिला टप्पा १५ ऑक्टोबर ते १९ ऑक्टोबर दरम्यान आहे. २३ ऑक्टोबर रोजी रोखे प्रमाणपत्र स्वरूपात किंवा डिमॅट खात्यावर गुंतवणूकदारांना वितरीत करण्यात येतील.

योजनेसाठी अर्ज फक्त भारतीय नागरिक, धर्मादाय संस्था, कंपन्या, ट्रस्ट, इ. करू शकतात. एक ग्रॅम सोन्यासाठी एक रोखा या स्वरूपात गुंतवणूक असेल. कमीत कमी अर्ज २ युनिट्स व जास्तीत जास्त ५०० युनिट्ससाठी अर्ज करता येईल. गुंतवणूक दोन नावाने असल्यास दुसरी व्यक्ती ५०० युनिट्ससाठी स्वतंत्र अर्ज करू शकते. योजनेचा हा पहिला टप्पा, नंतर पुढे फेब्रुवारीपर्यंत आणकी चार टप्पे असतील. बाजारात असलेल्या सोन्याच्या भावापेक्षा येथे तीन टक्के कमी भाव आहे. कारण ऑनलाईन रक्कम जमा करणाऱ्याला ५० रूपयांची सूट देण्यात येतेय. या योजनेचा पुढील टप्पा ५ नोव्हेंबर ते ९ नोव्हेंबर दरम्यान आहे. २०१५ मध्ये प्रथम मोदी सरकारने या योजनेचा शुभारंभ केला होता.

सार्वभौम सुवर्ण रोखे योजनेवर व्याज २.७५% दरसाल प्रमाणे सहामाहीसाठी देण्यात येईल. हे रोखे कर्जासाठी तारण ठेवता येतील. सर्व खात्यांप्रमाणे यासाठी तुमच्या ग्राहकास ओळखा (केवायसी) पूर्तता आवश्यक आहे. मिळणारे व्याज करपात्र असून भांडवली नफा सोन्याप्रमाणेच करपात्र असेल. डीमॅट खात्यावरील रोख्यांचे व्यवहार नोंदणी पश्चात शेअरबाजारात करता येतील. या रोख्यांची मुदत आठ वष्रे असेल व पाच वर्षांनतर कधीही, व्याज देय तारखेच्या जवळ रक्कम काढून घेता येईल. बाजारामध्ये सोन्याची किंमत वाढेल तशी तुमच्या बाँडीची किंमत वाढणार आहे.

सुवर्ण बाँड येथे खरेदी करा –
बँक, स्टॉक होल्डिंग कॉरपरेशन ऑफ इंडिया लि. (एसएचसीआईएल), डाकघर, मान्यताप्रात शेअर बाजार