22 January 2021

News Flash

नरेंद्र मोदींनी पाकसमोर शरणागती पत्कारली- केजरीवाल

पाकिस्तानच्या गुप्तचर आणि पोलीस अधिकाऱ्यांनी भारतात येण्याची ही पहिलीच वेळ आहे.

गुजरातमधील उनामध्ये गोरक्षक संघटनेच्या तरुणांनी चार दलित मुलांना अमानुषपणे मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर संपूर्ण देशाचे लक्ष या घटनेकडे वळाले.

पाकिस्तानच्या तपास पथकाला (जेआयटी) भारतात येण्याची परवानगी देऊन नरेंद्र मोदींनी पाकिस्तानसमोर शरणागती पत्करल्याची टीका दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली. पाकिस्तानात भारतविरोधी दहशतवादाला आश्रय मिळत असताना त्यांच्याच सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणेतील अधिकाऱ्यांना भारतात तपास करण्याची परवानगी कशी काय मिळू शकते, असा सवाल यावेळी केजरीवाल यांनी उपस्थित केला. पठाणकोट हल्ल्यामागे पाकिस्तानच्या आयएसआय या संघटनेचा हात असून हा पाक पुरस्कृत दहशतवाद आहे, असे आपण म्हणतो. तेव्हा या भूमिकेत बदल झाला असे समजायचे का? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानसमोर शरणागती पत्करल्याचे हे लक्षण आहे, असे केजरीवाल यांनी म्हटले.
पठाणकोट हवाई तळावर जानेवारीत झालेल्या हल्ल्याच्या तपासासाठी आयएसआयच्या एका अधिकाऱ्याचा समावेश असलेले पाकिस्तानचे पाच सदस्यांचे संयुक्त तपास पथक (जेआयटी) शनिवारी येथे येऊन पोहोचले होते. एखाद्या दहशतवादी हल्ल्याच्या तपासाकरिता पाकिस्तानच्या गुप्तचर आणि पोलीस अधिकाऱ्यांनी भारतात येण्याची ही पहिलीच वेळ आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2016 6:43 pm

Web Title: modi has surrendered before pakistan says kejriwal aap mlas protest pak probe team visit
Next Stories
1 ‘मोदींचे वागणे हुकूमशहासारखे, प्रत्येक राज्यावर त्यांना राज्य करायचंय’
2 नेतृत्त्वाच्या समस्येमुळे काँग्रेसच्या लोकप्रियतेला ओहोटी- जेटली
3 उत्तराखंडमधील राष्ट्रपती राजवटीविरोधात काँग्रेस हायकोर्टात
Just Now!
X