देशातील शेतकऱ्यांसाठी खूशखबर आहे. सलग तिसऱ्या वर्षी मान्सून सामान्य राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामानाची माहिती देणारी खासगी संस्था स्कायमेटच्या मते, यंदा दुष्काळ पडण्याची शक्यता खूपच कमी आहे. जून-जुलै-ऑगस्ट-सप्टेंबर दरम्यान चांगला पाऊस पडण्याची ५० टक्क्यांहून अधिक शक्यता आहे. मागील वर्षी २०१८ मध्ये जुलै-सप्टेंबरपर्यंत मान्सूनच्या अखेरीस पाऊस सरासरी ९१ टक्के राहिली. जो हवामान विभागाच्या ९७ टक्क्यांच्या अंदाजाच्या तुलनेत कमी होता. असे सलग पाचव्या वर्षी झाले, जेव्हा हवामान विभागाने अधिक पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

स्कायमेटच्या मते, वर्ष २०१९ मध्ये मान्सून हंगामात पाऊस सामान्य असण्याची शक्यता ५० टक्क्यांहून अधिक आहे. यंदा अल निनोची संधी खूप कमी आहे. स्कायमेटचा पहिला हवामान अंदाज १ एप्रिलला प्रसिद्ध होईल.

५ वर्षांत २०१५ मध्ये सर्वाधिक कमजोर मान्सून राहिला. त्यावेळी १४ टक्के कमी पाऊस झाला. ९६ टक्के ते १०४ टक्क्यादरम्यानचा पाऊस हा सामान्य मानला जातो.