‘मी पुन्हा येईन’ या मागची भूमिका काय? फडणवीसांनीच केले स्पष्ट; पवारांनाही दिलं उत्तर
मला माझ्या मर्यादा आणि क्षमता माहीत आहेत.

‘मी म्हणजेच महाराष्ट्र. मी म्हणेन तो महाराष्ट्र. माझ्या आसपास कुणीच नाही… हा देवेंद्र फडणवीसांनी दाखवलेला ‘मी’पणाचा दर्प जनतेला सहन झाला नाही आणि त्याचीच किंमत त्यांना मोजावी लागली,’ अशी खोचक टीका शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली होती. शरद पवारांच्या या टीकेला आणि मी पुन्हा येईन या मागील भूमिका माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत स्पष्ट केली आहे. ‘मी पुन्हा येईन’ ही कवितेची साधी ओळ आहे. निवडणूक प्रचारावेळी तिचा मी उल्लेख केला. लोकांना ही ओळ आवडली. त्यात कोणताही गर्व नव्हता आणि कसला दर्पही नव्हता,’ असं मुलाखतीत फडणवीस म्हणाले. वाचा सविस्तर…

कांद्याची महागाई कोर्टात, केंद्रीय मंत्र्याविरोधात तक्रार दाखल

कांद्याच्या वाढत्या भाववाढ नियंत्रणात आणण्यात केंद्र सरकारला अपयश आले असून यावरून सरकारकडून जनतेची दिशाभूल केली जात आहे, असा आरोप करत केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांच्याविरुद्ध एका व्यक्तीनं तक्रार दाखल केली आहे. बिहारमधील मुझफ्फरपूर येथील कोर्टात राजू नय्यर यांनी न्यायधंडाधिकाऱ्यांकडे पासवानांविरोधात फौजदारी तक्रार केली आहे. या तक्रारीवर १२ डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे. वाचा सविस्तर…

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी समन्वय समिती

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याला वेग देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने सर्व संबंधित वकिलांची तातडीने बैठक घेण्याचे तसेच एकनाथ शिंदे व छगन भुजबळ यांची समन्वयक मंत्री म्हणून नेमणूक करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी दिले. याशिवाय याबाबत ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांच्याशी चर्चा करण्याचेही मुख्यमंत्र्यांनी ठरविले आहे. वाचा सविस्तर…

मालिकेत वर्चस्वासाठी भारत सज्ज!

(संग्रहित छायाचित्र)

हैदराबादला विराट कोहलीने पाठलाग तंत्र यशस्वी राबवल्याने भारताला विजयी सलामी नोंदवता आली. आता रविवारी वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात फलंदाजीतील दिमाखदार कामगिरी कायम राखतानाच गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात सुधारणा करून मालिका जिंकण्याचे मनसुबे भारताने आखले आहेत. वाचा सविस्तर…

मानधनात उर्वशीने सलमानला टाकले मागे, तासाभरासाठी घेतलेली रक्कम वाचून व्हाल अवाक

नवीन वर्षाची सुरुवात प्रत्येकजण मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात करत असतो. अनेक ठिकाणी मोठमोठ्या पार्ट्यांचे आयोजन केले जाते. या पार्ट्यांमध्ये बॉलिवूड कलाकार देखील सहभागी होतात. त्यांची तासाभराची हजेरी अनेकांमध्ये आणखी उत्साह निर्माण करुन जाते. पण हेच कलाकार एका तासाच्या हजेरीसाठी कोट्यावधी रुपयांचे मानधन घेतात हे तुम्हाला माहिती आहे का? नुकताच अभिनेत्री उर्वशी रौतेला नवीन वर्षाच्या पार्टीमध्ये एक तास हजेरी लावण्यासाठी किती रक्कम घेणार हे समोर आले आहे. वाचा सविस्तर…