जम्मू- काश्मीरमध्ये चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू- काश्मीरमधील शोपियाँ येथे दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. या चकमकीच्या पार्श्वभूमीवर परिसरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

शोपियाँ जिल्ह्यातील अवनीरा येथे सुरक्षा दलांनी सोमवारी रात्रीपासून शोधमोहीम राबवली. मंगळवारी पहाटे झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. सुरक्षा दलांनी कंठस्नान घातलेले दोन्ही दहशतवादी अल – कायदाशी संबंधित अन्सार गझवट उल हिंद या दहशतवादी संघटनेचे सदस्य होते, असे समजते. वाचा सविस्तर…

तिन्ही डॉक्टरांकडून छळच

डॉ. पायल तडवी हिचा डॉ. हेमा आहुजा, डॉ. अंकिता खांडेलवाल आणि डॉ. भक्ती मेहेर यांनी छळ केला असल्याचा निष्कर्ष राज्यस्तरीय चौकशी समितीने काढला असला तरी या तिन्ही डॉक्टरांकडून जातीय शेरेबाजी केल्याचे ठोस पुरावे हाती लागलेले नाहीत, असे समितीने अहवालात स्पष्ट केले आहे. हे प्रकरण हाताळण्यात नायर रुग्णालयाचा स्त्रीरोग विभाग अपयशी ठरल्याचा ठपकाही या अहवालात ठेवण्यात आला आहे. वाचा सविस्तर…

वायफळ बातम्यांना महत्त्व देऊ नये : शिवसेना</strong>

राज्यात युतीचे ४१ खासदार आहेत, त्यामुळे पुढचा मुख्यमंत्री भाजपाचाच असेल असे वक्तव्य राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले होते. भाजपाने हा दावा केल्यानंतर शिवसेनेतून नाराजीचा सूर उमटत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, युतीच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे जाहीर केले त्यात कोणताही बदल होणार नाही, अशी माहिती शिवसेनेच्या सूत्रांकडून देण्यात आली. वाचा सविस्तर…

अमिताभ बच्चन यांचे ट्विटर अकाऊंट हॅक; केले ‘हे’ ट्विट

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांचे ट्विटर अकाऊंट हॅक केल्याचा प्रकार सोमवारी रात्री घडला. अय्यिलिदीज तिम तुर्कीश सायबर आर्मीने त्यांचे अकाऊंट हॅक केल्याचे समोर आले आहे. दरम्यान, या घटनेची पोलिसांनी दखल घेतली असून आता त्यांचे ट्विटर अकाऊंट पूर्ववत करण्यात आले आहे. अकाऊंट हॅक केल्यानंतर त्यावरून अमिताभ बच्चन यांचा फोटो काढून त्या जागी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा फोटो लावण्यात आला होता. वाचा सविस्तर…

भ्रमणध्वनीच्या अतिवापरामुळे मुलांचे भविष्यच धोक्यात!

स्मार्टफोनच्या (मोबाईल) अतिरिक्त वापरामुळे लहान मुलांचे समाजात मिसळण्याचे, लोकांना भेटण्याचे प्रमाण कमी होत आहे. या वाईट व्यसनामुळे मुलांच्या खाणपानावर परिणाम होत आहे, त्यांची एकाग्रता आणि शारीरिक विकासांवरही परिणाम जाणवू लागले असून हे धोकादायक आहे, असे निरीक्षण मानसोपचार तज्ज्ञांनी मांडले आहेत. वाचा सविस्तर…