चांद्रयान २: … म्हणून इस्रोने मानले भारतीयांचे आभार
देशभरातून इस्रोच्या या अभियानाचे कौतुक करण्यात आले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अंतराळ संशोधन संस्था इस्रो गेल्या अनेक दिवसांपासून विक्रम लँडरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे. इस्रोला मदत करण्यासाठी अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाही पुढे सरसावली होती. विक्रम लँडरशी संपर्क साधण्यासाठी आता केवळ चार दिवसांचा कालावधी उरला आहे. अशातच इस्रोने ट्विट करत आपल्या पाठिशी उभे राहिल्याबद्दल भारतीयांचे आभार मानले आहेत. विक्रम लँडरच्या सॉफ्ट लँडिंगदरम्यान अवघ्या काही किलोमीटर अंतरावर त्याचा कंट्रोल रूमशी संपर्क तुटला होता. त्यानंतर इस्रोकडून सतत विक्रम लँडरशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. वाचा सविस्तर…

अब्दुल्ला यांच्या अटकेवरून राहुल गांधींचा मोदी सरकारवर गंभीर आरोप

कलम ३७० रद्द करण्याला महिना लोटला तरी त्यावरून सुरू असलेल्या आरोपप्रत्यारोपांच्या फैरी सुरूच आहेत. त्यात जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांना सार्वजनिक सुरक्षा कायद्यातंर्गत ताब्यात घेतल्यानंतर विरोधक आक्रमक झाले आहेत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही फारूक अब्दुल्ला आणि जम्मू काश्मीरमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीवरून मोदी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. “केंद्र सरकार जम्मू काश्मीरमध्ये राजकीय पोकळी निर्माण करून ती दहशतवाद्यांनी भरण्याचा प्रयत्न करीत आहे,” अशी आरोप राहुल यांनी केला आहे. वाचा सविस्तर…

नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत सरकार करणार फेरविचार-मुख्यमंत्री

नाणारला रिफायनरी प्रकल्प आणण्याबाबत सरकार फेरविचार करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजापूर येथे म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश कोकणात आहे. त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाणारला रिफायनरी प्रकल्प आणण्याबाबत फेरविचार करु असं म्हटलं आहे. नाणार प्रकल्पामुळे एक लाख बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे त्यामुळे हा प्रकल्प आणण्याचा फेरविचार आम्ही करतो आहोत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. वाचा सविस्तर…

पंत आणि पावसाची भारताला चिंता!

धरमशाला येथे होणारा पहिला सामना पावसामुळे पूर्णपणे वाया गेल्यावर आता बुधवारी रंगणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या ट्वेन्टी-२० क्रिकेट मालिकेतील दुसऱ्या लढतीत भारतीय संघाला पावसाबरोबरच युवा फलंदाज ऋषभ पंतच्या कामगिरीची चिंता असणार आहे. या सामन्याद्वारे मायदेशात आफ्रिकेविरुद्ध पहिला ट्वेन्टी-२० विजय मिळवण्यासाठीही भारतीय खेळाडू उत्सुक आहेत. वाचा सविस्तर…

तापसीचं ‘मिशन डेटींग’ सुरु, करते याला डेट

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू बी-टाऊनमधील सध्याची लोकप्रिय अभिनेत्री आहे. स्पष्ट व्यक्तव्यामुळे चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी तापसी मात्र खासगी आयुष्याबद्दल नेहमीच मौन बाळगते. काही दिवसांपूर्वी तापसीचा ‘मिशन मंगल’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिवर चांगली कमाई केली. आता तापसीचे मिशन डेटींग सुरु असल्याच्या चर्चा सुरु आहेत. वाचा सविस्तर…

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Morning bulletin top 5 news avb 95
First published on: 18-09-2019 at 09:13 IST