‘खेकड्यांनी भोकं पाडल्याने फुटले तिवरे धरण’, जलसंधारण मंत्र्यांचा अजब दावा

जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी हा अजब दावा केला आहे

खेकड्यांनी भोकं पाडल्याने जे भगदाड पडलं त्यामुळेच तिवरे धरण फुटलं असा अजब दावा जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी केला आहे. तिवरे धरण फुटणे ही एक नैसर्गिक आपत्ती होती. काही गोष्टी कुणाच्याही हातात नसतात. ही एक दुर्घटना होती. अधिकाऱ्यांशी आणि जुन्या जाणत्या ग्रामस्थांशी मी चर्चा केली त्यांनी सांगितल्याप्रमाणे हे धरण खेकड्यांनी पोखरल्याने फुटलं असा अजब दावा जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी केला आहे. वाचा सविस्तर..

Cricket World Cup 2019 : पाकिस्तानची ‘घरवापसी’

१९९२च्या विश्वचषक विजेत्या पाकिस्तानसाठी उपांत्य फेरीचे दरवाजे जवळपास बंद झाल्यातच जमा आहेत. मात्र गणितीय रचनेनुसार त्यांना अंधुकशा आशा दिसत आहेत. आता उपांत्य फेरीत मजल मारण्यासाठी शुक्रवारी बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या सामन्यात पाकिस्तानला अशक्यप्राय असा विजय मिळवावा लागणार आहे. वाचा सविस्तर..

राहुल यांच्यावर आणखी एक खटला

पत्रकार गौरी लंकेश हत्येशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संबंध असल्याच्या वक्तव्यप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात मुंबईच्या माझगाव-शिवडी महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर अब्रुनुकसानीचा खटला चालवण्यात येणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांने दाखल केलेल्या तक्रारीप्रकरणी राहुल यांनी आपण निर्दोष असल्याचा दावा केला. न्यायालयाने राहुल यांना १५ हजार रुपयांच्या हमीवर जामीन मंजूर करत खटल्याच्या सुनावणीला कायमस्वरूपी अनुपस्थित राहण्याची परवानगीही दिली. वाचा सविस्तर..

शेतकऱ्यांनी अडचणीच्या काळात फक्त शिवसेनेला हाक द्यावी

ग्रामीण भागात दुष्काळी परिस्थिती किंवा शेतीच्या अन्य प्रश्नांवर शेतक ऱ्यांनी निराश होऊन आयुष्याचे बरे-वाईट करून घेऊन नये. प्रत्येक अडचणीच्या काळात शिवसेनेला हाक द्यावी, प्रत्येक वेळी शिवसेना मदतीला धावून येईल, अशी ग्वाही शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी दिली. वाचा सविस्तर..

आशा भोसले यांना स्वामीभूषण पुरस्कार

अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्यावतीने यंदापासून सुरू करण्यात आलेल्या स्वामीरत्न राष्ट्रीय पुरस्कार ख्यातनाम गायिका आशा भोसले यांना जाहीर झाला आहे. पाच लाख रुपये रोख, सन्मानचित्र व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. याशिवाय स्वामीभूषण राज्य पुरस्कारासाठी मराठी चित्रपट अभिनेते स्वप्नील जोशी आणि ज्येष्ठ रानकवी ना. धों. महानोर यांना जाहीर झाला आहे. येत्या १६ जुलै रोजी गुरूपौर्णिमेच्या दिवशी अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे. वाचा सविस्तर..