काश्मीरमधून कलम ३७० हटवाच, शिवसेनेची आग्रही मागणी

मेहबुबा मुफ्ती आणि फारूक अब्दुल्ला या दोघांवरही शिवसेनेने टीकेचे ताशेरे ओढले आहेत

जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवाच अशी आग्रही मागणी शिवसेनेने केली आहे. जम्मू काश्मीरची मुख्य समस्या काश्मीरमध्ये आहे पाकिस्तानात नाही असाही दावा शिवसेनेने केला आहे. तसेच जम्मू काश्मीरमधली राष्ट्रपती राजवट सहा महिने वाढवण्याच्या निर्णयाचेही समर्थन केले आहे. काश्मीरमधला मुख्य मुद्दा निवडणुका नसून कलम ३७० हटवणे आहे असेही शिवसेनेने म्हटलं आहे. सामनाच्या अग्रलेखातून मेहबुबा मुफ्ती आणि फारूख अब्दुल्ला या दोन नेत्यांवरही टीका करण्यात आली आहे. वाचा सविस्तर..

४८ कोटींच्या रस्त्याला भगदाड

जव्हार-सेल्वासा या रस्त्याच्या २० किलोमीटर लांबीच्या कामाला आरंभ झाला असून, या ४८ कोटी रुपयांच्या रस्त्यावरील काही भाग पहिल्याच पावसात खचला. या रस्त्याच्या महिन्याभरापूर्वी उभारलेल्या रस्त्याचा भाग पहिल्या पावसात खचला गेल्याने या रस्त्याच्या कामाच्या दर्जाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. वाचा सविस्तर…

World Cup 2019 : मयांक अग्रवालला संधी मिळण्यामागे शास्त्री-कोहली जोडगोळीचा हात??

दुखापतग्रस्त विजय शंकरला विश्वचषक संघातलं स्थान गमवावं लागल्यानंतर, मयांक अग्रवालला भारतीय संघात स्थान देण्यात आलं. अग्रवालच्या निवडीमुळे माजी क्रिकेटपटू ते चाहते सर्वांनी आश्चर्य व्यक्त केलं. अंबाती रायुडूसारखा अनुभवी फलंदाज असताना मयांक अग्रवालसारख्या तुलनेने नवख्या फलंदाजावर निवड समितीने विश्वास का टाकला असेल हा प्रश्न सर्वांनाच्या मनात घोळत होता. या घटनेनंतर अंबाती रायुडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. मिळालेल्या माहितीनुसार, मयांक अग्रवालच्या संघात निवडीमागे रवी शास्त्री-विराट कोहली या जोडीचा हात असल्याचं समजतंय. वाचा सविस्तर..

रेल्वे उपनगरी गाडय़ांचा रोजच गोंधळ

लोकलचे वेळापत्रक सुरळीत करा, असे आदेश चार दिवसांपूर्वीच रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी मध्य रेल्वेला दिले. पण ते दुरूस्त करण्याऐवजी बुधवारी ऐन गर्दीच्या वेळी मेगाब्लॉकचे वेळापत्रक चालवून मध्य रेल्वे प्रशासनाने आपल्या नियोजनशून्य कारभाराची पावतीच जणू गोयल यांना दिली. तोही पावसाचा एक टिपूस मुंबई-ठाण्यात नसताना. तांत्रिक बिघाड व अन्य कारणांमुळे जून महिन्यात ६०० पेक्षा जास्त लोकल फेऱ्या उशिराने धावल्या. त्यानंतर आता जुलै महिन्यात पाऊस सुरू होत नाही तोच लोकल सेवेचा पुरता बोजवारा उडाला आहे. वाचा सविस्तर..

अनुराग कश्यप, अनुपम खेर ‘ऑस्कर अकादमी’मध्ये

दिग्दर्शक झोया अख्तर, अनुराग कश्यप आणि अभिनेते अनुपम खेर यांना ऑस्कर अकादमीमध्ये सहभागी होण्यासाठी निमंत्रण देण्यात आले आहे. ऑस्कर अकादमीने या वर्षी ८४२ नव्या सदस्यांना ऑस्कर अकादमीमध्ये सहभागी होण्याचे निमंत्रण दिले आहे. यामध्ये लेखक-दिग्दर्शक रितेश बत्रा, व्हिज्युअल इफेक्टसाठी प्रसिद्ध असलेले शेरी भारदा आणि श्रीनिवास मोहन यांचाही समावेश आहे. वाचा सविस्तर..