भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. केवळ येथील संस्कृती किंवा परंपरेमुळेच नाही तर येथील निसर्गसौंदर्यामुळेही त्याची जगभरात चर्चा होत असते. भारतात असे अनेक रस्ते आहेत जे पर्वतांमधून, द-या खो-यातून जात असतात. त्यातच काही रस्ते असेही आहेत जेथे बर्फवृष्टी होत असते. अशा वळाणावरुन मार्ग काढताना जीव मुठीत घ्यावा लागतो. असेच काही मार्ग आहेत जेथून जात असताना मन आणि डोकं दोन्ही शांत ठेवावं लागतं. केवळ एक चूक आपल्याला मृत्यूच्या दारात नेऊ शकतात. या मार्गापैकी असे पाच मार्ग आहेत जे प्रचंड धोकादायक आहेत.

१. जोजी ला-जोजि – निसर्गाचा मनमुराद आनंद लुटायचा असेल तर या मार्गावरुन एकदा तरी नक्कीच प्रवास करा. मात्र आपल्या स्वत:च्या जबाबदारीवर. हा मार्ग लेह ते श्रीनगर येथून जाणारा असून अत्यंत धोकादायक आहे. विशेष म्हणजे ११००० फूट उंचीवर असलेल्या या मार्गामधून जातांना आपले हात आभाळाला टेकल्याचा भास होतो. या मार्गावर अनेक वेळा बर्फवृष्टी होत असते. यावेळी मात्र वाहन प्रचंड सावकाश आणि सांभाळून चालवावी लागतात.

shares market, stock prices
तेजीला पूर्णविराम की स्वल्पविराम?
f you're watching your blood sugar levels, you might want to keep an eye on how much bread you're pairing with your eggs
अंडे ब्रेडबरोबर खावे की ब्रेडशिवाय? रक्तातील साखर वाढू नये म्हणून अंडे कसे खावे? जाणून घ्या अंडी खाण्याचा उत्तम मार्ग
Birds mumbai, Birds suffer from heat,
मुंबई : वाढत्या उष्म्याचा पक्ष्यांना त्रास, १६ दिवसांमध्ये १०० हून अधिक पक्षी व प्राणी रुग्णालयात दाखल
The Food and Agriculture Organization of the United Nations has projected an increase in wheat production worldwide including in India
भारतात यंदा उच्चांकी गहू उत्पादन? काय कारण? जगात काय स्थिती?

२. थ्री लेव्हल झिग-झॅक रोड – वळणदार रस्त्यांवरुन प्रवास करायची इच्छा असेल तर हा मार्ग उत्तम आहे. मात्र तेवढाच तो धोकादायकही आहे. ज्या व्यक्ती कमी धीट आहेत अशा व्यक्तींनी तर या मार्गावरुन प्रवास करुच नये असा सल्ला अनेकांना देण्यात येतो.
३. खारदुंग ला- लडाखमधील खारडुंग हा देशातील सर्वात धोकादायक रस्त्यांपैकी एक रस्ता आहे. हा मार्ग १८ हजार ३८० फूट उंच आहे. हा मार्ग उंच ठिकाणावर असल्यामुळे येथे थंड हवेचा वेगही तेवढाच असतो. त्यामुळे येथे ऑक्सिजनची कमतरता भासते.

४. लेह-मनाली महामार्ग – निसर्गसौंदर्याने परिपूर्ण असलेला हा मार्ग प्रचंड धोकादायक आहे. या महामार्गाला दोन्ही बाजूंनी उंच पठारांना घेरले आहे. त्यातच यावर बर्फाची चादर पसरल्यामुळे हा मार्ग अधिकच भयानक वाटतो. दरम्यान, येथे बर्फवृष्टी झाल्यावर येथे प्रवास करणे धोकादायक ठरते.

५. नाथू ला- सिक्कीमधील हा रस्ता दिसतांना सहज सोपा वाटला तरी तो इतका सरळ नाही. या मार्गावर अनेक वळण असून गाडी चालवताना विशेष लक्ष द्यावे लागते. या ठिकाणी कोणत्याही गाडीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला तर सरळ मृत्यूला सामोरे जावे लागेल. त्यामुळे या मार्गांवरुन जातांना विशेष लक्ष द्यावे लागते.