03 March 2021

News Flash

रिलायन्सने करुन दाखवलं; चीनपेक्षा स्वस्त आणि दर्जेदार PPE किट्स केले तयार

दिवसाला तयार होत आहेत १ लाख पीपीई किट्स

एकीकडे देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. तर दुसरीकडे करोनाचा सामना करण्यासाठी दिवसरात्र झटणाऱ्या डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचाऱ्यांना, तसंच पोलिसांसह अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांसाठी पीपीई किट्सची आवश्यकता आहे. अशा परिस्थितीत आता मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजनं पुढाकार घेतला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजनं चीनपेक्षा तीन पण कमी किंमतीत ही पीपीई किट्स तयार करण्यास सुरूवात केली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या सिल्व्हासा येथील प्रकल्पात दररोज १ लाख पीपीई किट्स तयार करण्यात येत आहेत.

डॉक्टर्स, परिचारिका, अन्य वैद्यकीय कर्मचाऱ्यासोबतच डॉक्टरांनादेखील या पीपीई किट्सची आवश्यकता आहे. चीनमधून आयात करण्यात येणाऱ्या पीपीई किट्सची किंमत २ हजार रूपयांपेक्षा अधिक होती. तर रिलायन्स इंडस्ट्रीजची कंपनी अलोक इंडस्ट्रीजनं तयार केलेल्या पीपीई किट्सची किंमत केवळ ६५० रूपये इतकी आहे.

दररोज १ लाख पीपीई किट्सची निर्मिती

रिलायन्स इंडस्ट्रीजकडून यासंदर्भातील माहिती देण्यात आली. दररोज १ लाख पीपीई किट्स तयार करण्यासाठी कंपनीनं आपल्या निरनिराळ्या प्रकल्पांमध्ये काम सुरू केलं आहे. जामनगर येथील सर्वात मोठ्या रिफायनरीनंदेखील पेट्रोकेमिकल्सचं मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू केलं आहे. याच्याच वापरानं पीपीई किटचा कपडा तयार करण्यात येतो. याच कपड्याचा वापर करून अलोक इंडस्ट्रीजमध्ये पीपीई किट्स तयार करण्यात येत आहेत. काही दिवसांपूर्वीच अलोक इंडस्ट्रीजचं रिलायन्स इंडस्ट्रीजनं अधिग्रहण केलं होतं. या कंपनीद्वारे सर्व सुविधांचा वापर पीपीई किट्स तयार करण्यासाठी केला जात आहे. तर यामुळे १० हजार जणांना रोजगारदेखील मिळाला आहे.

करोना टेस्टिंग किट, ४५ मिनिटांत रिझल्ट

रिलायन्स इंडस्ट्रीजनं करोनाच्या टेस्टिंग किटमध्येही स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. काऊन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रिअल रिसर्चच्या मदतीनं रिलायन्सनं हे स्वदेशी टेस्टिंग किट तयार केलं आहे. हे किटदेखील चीनच्या टेस्टिंग किट्सपेक्षा अनेक पटींनी स्वस्त असून ४५ मिनिटं ते एक तासाच्या आत रुग्णाचा संपूर्ण माहिती मिळते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 29, 2020 11:45 am

Web Title: mukesh ambani reliance industries stated manufacturing ppe kits less costly than china coronavirus jud 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 बस, ट्रेन नाही तर थेट विमानाने १८० मजुरांना घरी आणलं, ‘या’ राज्यावर होतोय कौतुकाचा वर्षाव
2 ‘लॉकडाउन यादव’ला शुभेच्छा देत अखिलेश यादव यांचा भाजपाला टोला; म्हणाले…
3 भारत चीन सीमा वाद: डोनाल्ड ट्रम्प यांची मोदींशी कोणतीही चर्चा झालेली नाही, भारताने फेटाळला दावा
Just Now!
X