अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस हे जगातले सगळ्यात श्रीमंत गृहस्थ ठरले आहेत. फोर्ब्जने अब्जाधीशांची यादी जाहीर केली असून 110 अब्ज डॉलर्सची संपत्ती असलेले बेझोस पहिल्या स्थानावर आहेत. तर या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी 19व्या स्थानावर आहेत. गेल्या वर्षी अंबानी 20व्या स्थानावर होते. मुकेश अंबानी यांच्या संपत्तीचे मूल्य 40.1 अब्ज डॉलर्स असल्याचे फोर्ब्जनं म्हटले आहे.

अब्जाधीशांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स असून त्यांची संपत्ती 90 अब्ज डॉलर्सची आहे. गुंतवणूक गुरू अशी ओळख असलेले वॉरन बफेट 84 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह तिसऱ्या स्थानावर असून बर्नार्ड अरनॉल्ट चौथ्या (72 अब्ज डॉलर्स) व फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग पाचव्या (71 अब्ज डॉलर्स) स्थानावर आहेत.

फोर्ब्जच्या यादीत 3.1 अब्ज डॉलर्सची संपत्ती असलेले अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे ही आहेत. पतंजली सीईओ हे ही 6.3 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीचे मालक असून ते फोर्ब्जच्या यादीत आहेत. फोर्ब्जच्या यादीत अनेक भारतीय उद्योगपती असून त्यांची नावे पुढीलप्रमाणे…

– हिंदुजा कुटुंबिय – 19.5 अब्ज डॉलर्स
– अझीम प्रेमजी – 18.8 अब्ज डॉलर्स
– लक्ष्मी मित्तल – 18.5 अब्ज डॉलर्स
– शिव नाडर – 14.6 अब्ज डॉलर्स
– दिलीप संघवी – 12.8 अब्ज डॉलर्स
– कुमार बिर्ला – 11.8 अब्ज डॉलर्स
– उदय कोटक – 10.7 अब्ज डॉलर्स
– राधाकृष्ण धामानी – 10 अब्ज डॉलर्स
– सायरस पुनावाला – 9.1 अब्ज डॉलर्स
– सावित्री जिंदाल व कुटुंब – 8.8 अब्ज डॉलर्स
– सुनील मित्तल व कुटुंब – 8.8 अब्ज डॉलर्स
– पतंजलीचे आचार्य बालकृष्ण – 6.3 अब्ज डॉलर्स
– विक्रम लाल – 6.3 अब्ज डॉलर्स
– नुसली वाडिया – 6.2 अब्ज डॉलर्स
– बेणू गोपाळ बांगर – 6 अब्ज डॉलर्स
– विवेक चंद सेहगल – 6 अब्ज डॉलर्स
– कलानिधी मारन – 5.2 अब्ज डॉलर्स
– सुभाष चंद्रा – 5 अब्ज डॉलर्स
– पंकज पटेल – 5 अब्ज डॉलर्स
– एमए युसूफ अली – 5 अब्ज डॉलर्स
– अजय पिरामल – 4.9 अब्ज डॉलर्स
– निरज, मधुर व शेखर बजाज – 4.8 अब्ज डॉलर्स