News Flash

मुझफ्फर अली यांना राजीव गांधी सद्भावना पुरस्कार

प्रसिद्ध चित्रपटनिर्माते मुझफ्फर अली यांना राजीव गांधी सद्भावना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यांनी ‘उमराव जान’ हा चित्रपट दिग्दर्शित केला होता.

| August 2, 2014 02:39 am

प्रसिद्ध चित्रपटनिर्माते मुझफ्फर अली यांना राजीव गांधी सद्भावना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
 त्यांनी ‘उमराव जान’ हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. जातीय सलोख्यासाठी त्यांनी उल्लेखनीय काम केल्याने त्यांना पाच लाख रूपये व मानपत्र अशा स्वरूपाचा हा पुरस्कार जाहीर झाला आहे. मुझफ्फर अली हे सुफी कवी असून राजीव गांधी सद्भावना पुरस्कार समितीच्या सल्लागार समितीने त्यांची निवड केली आहे. अली यांचा जन्म लखनौ येथे झाला. त्यांनी ‘गमन’ व ‘खिझान’ यासह काही चित्रपट दिग्दर्शित केले. त्यांना २००५ मध्ये ‘पद्मश्री’ किताब मिळाला. २० ऑगस्टला त्यांना हा पुरस्कार सोनिया गांधी यांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2014 2:39 am

Web Title: muzaffar ali to get rajiv gandhi national sadbhavana award
टॅग : Rajiv Gandhi
Next Stories
1 ‘मोदींना व्हिसा नाकारला तो आधीच्या सरकारने’
2 सुब्रतो रॉय ‘तिहार’मध्ये खरेदीदारांशी वाटाघाटी करणार!
3 कामगार कायद्यांत आमूलाग्र बदल?
Just Now!
X