पाकिस्तानाचे माजी राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांना ‘एनएबी’ने बनावट बँक खाते प्रकरणी अटक केली आहे. एएनआय वृत्तसंस्थेने ही बातमी दिली आहे.

पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांना बनावट बँक खाते प्रकरणी अटक करण्यात आली आहे. नॅशनल अकांउटेबलीटी ब्यूरो (एनएबी) ने त्यांना अटक केली आहे.पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) चे ते सह अध्यक्ष आहेत.
आसिफ अली झरदारी यांचा जामिनाचा अर्ज फेटाळून लावल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. हे सर्व प्रकरण कोट्यावधी रूपयांचे आहे. झरदारी यांना मंगळवारी न्यायालयासमोर सादर करण्यात येणार आहे. या अगोदर मे महिन्यात झरदारी यांना भ्रष्टाचाराच्या सहा प्रकरणामध्ये इस्लामाबाद उच्च न्यायालयाने अंतरिम जामिन मंजूर केला होता.

पाकिस्तानजी भ्रष्टाचार प्रतिबंधक संस्था या प्रकरणाचा तपास करत आहे. ‘एनएबी’ ने न्यायालयात सादर केलेल्या ११ पानांच्या अहवालानुसार ३६ तपास प्रकरणात पाकिस्तान पीपल्स पार्टीचे ६३ वर्षीय सह अध्यक्ष यांचे नाव आहे. तसेच एनएबीचा दावा आहे की किमान आठ प्रकरणात झरदारी यांचा समावेश असल्याचे सिद्ध झाले आहे.

न्यायमूर्ती उमर फारूकी यांच्या अध्यक्षतेखाली दोन न्यायधीशांच्या पीठाने सहा प्रकरणातील अटकेपूर्वी जामिनाची मागणी करण्यात आलेल्या अर्जाच्या सुनावणी दरम्यान त्यांची बहीण फरयाल तलपुर यांना अंतिम जामिन दिला होता. तर न्यायालयाने झरदारींना ३० मे पर्यंत अंतिम जामिन दिला होता. तर काही दिवसांपूर्वीच झरदारींनी पंतप्रधान इमरान खान यांना हटवण्याचा निश्चिय जाहीर केला होता. शिवाय सरकारवर महागाई व बेरोजगारी वाढवल्याचा आरोपही केला होता.