भारतातील निवडणूक आयोगाचं काम पाहून देशाला अभिमान वाटतो, अशी स्तुती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय निवडणुकी आयोगाची केली. मतदार असणं आणि मतदानाचा अधिकार बजावण ही आपल्यासाठी अभिमानास्पद गोष्ट असायली हवी. २१ व्या शतकात जन्मलेल्या तरुणांनी, लोकसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला पाहिजे.  आपल्या ५२व्या ‘मन की बात’द्वारे पंतप्रधान देशवासीयांशी संवाद साधत आहेत.

२५ जानेवारी रोजी निवडणुक आयोगाची स्थापना झाली होती. प्रत्येक वर्षी दिनांक २५ जानेवारी हा दिवस “राष्ट्रीय मतदार दिवस ” म्हणून साजरा केला जातो. देशातील प्रत्येक  निवडणुकीची जबाबदारी भारतीय निवडणुक आयोगावर असते. त्यामुळे देशातील प्रत्येकाला निवडणुक आयोगावर गर्व असायला हवा. समुद्र सपाटीपासून १५००० फूट उंचीवर हिमाचल प्रदेशमध्ये मतदान केंद्राची स्थापना केली जाते. त्याशिवाय अंदमानसारख्या बेटावरही मतदानाचा हक्क बजावण्याची व्यवस्था निवडणुक आयोगाकडून केली जाते. निवडणुक आयोग नेहमीच लोकशाहीला बळकटी देणाचा प्रयत्न करते, ही बाब कौतुकस्पद असल्याचे मोदी म्हणाले. आगामी काही दिवसांमध्ये होणाऱ्या लोकसभा निवडुकांमध्ये अनेक युवकांना पहिल्यांदाच मतदानाचा हक्क मिळेल. योग्य उमेदवाराला निवडून द्या. स्वत:च्या स्वप्नाला देशाच्या स्वप्नासोबत जोडा असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्य मतदरांना दिला.

 

पंतप्रधान मोदींनी मन की बात कार्यक्रमाच्या सुरूवातीला शिवकुमार स्वामींना श्रद्धांजली वाहिली. ते म्हणाले की, शिवकुमार स्वामींनी आपले सर्व आयुष्य समाज सेवासाठी समर्पित केलं होते. १११ वर्षाच्या कार्यकाळात स्वामींनी हजारो लोकांसाठी सामजिक, शैक्षणिक आणि आर्थिक मदत केली. २१ तारखेला त्यांनी कर्नाटकमधील सिद्धगंगा मठामध्ये अंतिम श्वास घेतल्याची बातमी मिळताच मला दुख झाले.

मन की बात महत्वाचे मुद्दे – 

  • सौंदर्यस्पर्धांप्रमाणेच स्वच्छ शौचालय स्पर्धा आयोजित करायला हवी.
  • विद्यार्थ्यांनी तयार केलेला ‘कलाम उपग्रह’ नवा इतिहास रचेल.
  • रवींद्रनाथ टागोर यांना आतापर्यंत लेखक आणि संगीतकार म्हणून ओळखत असाल; पण ते एक चांगले चित्रकार देखील होते
  • नेताजींच्या कुटुंबानं मला एक खास टोपी भेट दिली आहे. ही टोपी नेताजी कधी कधी परिधान करत असत
  • सुभाषचंद्र बोस एक थोर सेनानी म्हणून प्रत्येक भारतीयांच्या नेहमीच लक्षात राहतील