नासाच्या अंतराळ दुर्बिणीने आतापर्यंतचा सर्वात लांबचा तारा शोधून काढला आहे. विश्वाच्या मध्यावर निळया रंगात असणाऱ्या या विशाल ताऱ्याचे नाव ‘इकारस’ असे ठेवण्यात आले आहे. हा तारा इतका दूर आहे की, या ताऱ्याचा सूर्यप्रकाश पृथ्वीपर्यंत पोहोचण्यासाठी नऊ अब्ज वर्षे लागतील. जगातील सर्वात मोठय़ा दुर्बिणीनेही हा तारा धूसर दिसू शकतो.

गुरुत्वाकर्षण लेन्सिंग नावाच्या प्रक्रियेमुळे धूसर तारा चमकू शकतो. यामुळे खगोलशात्रज्ञ दूरवरील ताऱ्यांनाही पाहू शकतात. आम्ही आकाराने मोठा आणि आपल्यासारखा एकटा तारा पाहिल्याची ही पहिलीच वेळ असल्याचे बर्केले युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियातील या संशोधनाचे नेतृत्व करणाऱ्या पेट्रिक केली यांनी म्हटले आहे.

आपण त्या ठिकाणी अनेक आकाशगंगांना पाहू शकता. मात्र हा तारा या ताऱ्यांच्या कमीत कमी १०० पट दूर आहे, ज्याचा आम्ही अभ्यास करीत आहोत, असे केली यांनी म्हटले.