प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तणाव निवळण्यासाठी एकीकडे भारत आणि चीन यांच्यात लष्करी स्तरावर चर्चा सुरू असतानाच, सोमवारी रात्री गलवाण खोऱ्यात अचानक उद्भवलेल्या संघर्षामध्ये भारताचे २० जवान शहीद झाले. तर, चीनच्या ४३ सैनिकांना ठार करण्यात आलं. यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव अधिकच वाढल्याचे दिसत आहे. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

आणखी वाचा- मोठी बातमी! चीनसोबत झालेल्या चकमकीत २० भारतीय जवान शहीद, संख्या वाढण्याची भीती

गलवान खोऱ्यातील जवानांचं शहीद होणं हे अत्यंत अवस्वस्थ करणारं व वेदनादायी आहे. आपल्या जवानांनी सीमेवर कर्तव्य बजावताना अतुलनीय शौर्य व पराक्रम दाखवत, भारतीय लष्कराच्या सर्वोच्च परंपरेनुसार देशासाठी बलिदान दिले. या जवानांचे शौर्य व त्याग देश कधीच विसरणार नाही. शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. या कठीण काळात संपूर्ण देश त्यांच्याबरोबर उभा आहे. आम्हाला भारताच्या या शूरवीरांच्या शौर्याचा आणि धाडसाचा अभिमान आहे.

आणखी वाचा- भारत-चीनमध्ये त्या रात्री नेमकं काय घडलं?

आणखी वाचा- भारत विरुद्ध चीन: सीमेवर झालेल्या हिंसेबद्दल संयुक्त राष्ट्र संघाची पहिली प्रतिक्रिया

गलवाण खोऱ्यात भारत व चीन सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षात लष्कराच्या २० जवानांना वीरमरण आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून पूर्व लडाखमधील सीमाभागात तणाव निर्माण झाला होता. तणाव निवळण्यासाठी सुरू असलेल्या चर्चेदरम्यान ही घटना घडली. या घटनेनंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. त्याचबरोबर विरोधकांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारले जात असून, शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनीही सीमेवरील स्थितीविषयी पंतप्रधानांना सत्य सांगण्याच आवाहन केलं आहे.