News Flash

पीडीपीला पाठिंबा देण्यास नॅशनल कॉन्फरन्स तयार

जम्मू- काश्मीरमध्ये नवे सरकार स्थापन करण्यासाठी आपण भाजपशी युती करणार नाही, हे नॅशनल कॉन्फरन्सने स्पष्ट केले असून, पीडीपीला पाठिंबा देण्याच्या आपल्या इराद्याचा पुनरुच्चार केला आहे.

| January 13, 2015 12:01 pm

जम्मू- काश्मीरमध्ये नवे सरकार स्थापन करण्यासाठी आपण भाजपशी युती करणार नाही, हे नॅशनल कॉन्फरन्सने स्पष्ट केले असून, पीडीपीला पाठिंबा देण्याच्या आपल्या इराद्याचा पुनरुच्चार केला आहे.
कुठल्याही परिस्थितीत आम्ही भाजपसोबत हातमिळवणी करणार नाही, असे नॅकॉचे वरिष्ठ नेते मोहम्मद अकबर लोन यांनी सोमवारी पक्षाच्या कोअर ग्रुपच्या बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले. पीडीपीने राज्यातील लोकांच्या कल्याणाची भूमिका घेतली तर आम्ही त्यांच्यासोबत जाण्यास तयार आहोत, असे ते म्हणाले.
पश्चिम पाकिस्तानातील निर्वासितांना रहिवासाचा आणि मतदानाचा अधिकार देण्याची शिफारस एका संयुक्त संसदीय समितीने केली आहे. त्याबद्दल विचारले असता लोन म्हणाले, की केंद्राने असा काही प्रयत्न केल्यास आमचा पक्ष त्याविरुद्ध आंदोलन करेल.राज्यात राज्यपाल राजवट लागू करण्यात आल्यानंतर तीन दिवसांनी पक्षाचे कार्याध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी त्यांच्या निवासस्थानी बैठक झाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2015 12:01 pm

Web Title: national conference ready to support pdp
टॅग : Pdp
Next Stories
1 वादग्रस्त विधानांप्रकरणी खासदार साक्षी महाराज यांना भाजपची नोटीस
2 सुनंदा पुष्कर यांचा व्हिसेरा परदेशात पाठविण्याबाबतचा निर्णय एक-दोन दिवसांत
3 काश्मीरचा मुद्दा वगळून भारताशी चर्चा नाही
Just Now!
X