News Flash

एनसीबी उपसंचालकांना करोना, दीपिकासह इतर अभिनेत्रींची केली होती चौकशी

सुशांत सिंह प्रकरणाचा तपास करणाऱ्या आधिकाऱ्यांना करोना

एनसीबी उपसंचालक केपीएस मल्होत्र (फोटो एएनआय)

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात बॉलिवूडमधील ड्रग्स कनेक्शनचा तपास करणारे अंमली पदार्थ विरोधी पथकाचे (एनसीबी) उपसंचालक केपीएस मल्होत्रा यांना करोनाची लागण झाली आहे, करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर केपीएस मल्होत्रा मुंबईहून दिल्लीला गेले आहेत.

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात ड्रग्स कनेक्शनचा तपास करताना बॉलिवूडमधील अनेक नावे समोर आली. बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध चेहेरे एनसीबीच्या रडारावर आहेत. एनसीबीच्या टीमने नुकतीच बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि इतर अभिनेत्रींची चौकशी केली होती. एनसीबीच्या या टीमचे केपीएस मल्होत्रा नेतृत्व करत आहे. शनिवारी रात्री केपीएस मल्होत्रा यांचा करोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

२६ सप्टेंबर रोजी एनसीबीने दीपिकाची साडेपाच तास चौकशी केली. या चौकशीदरम्यान दीपिकाला रिया अथवा सुशांत प्रकरणावर एकही प्रश्न विचारण्यात आला नाही. NCBने दीपिकाला करिश्मासोबतच्या चॅटिंगबद्दल प्रश्न विचारले. या चौकशीदरम्यान दीपिकाने ड्रग्सचं सेवन केल्याचं नाकारलं. त्याचसोबत व्हॉट्स अॅप चॅट खरे असल्याची कबुली दिली.

सुशांतची हत्या नव्हे आत्महत्याच, एम्सकडून शिक्कामोर्तब
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाला रोज वेगळं वळण मिळत असताना एम्स रुग्णालयामधील टीमने सीबीआयकडे अंतिम रिपोर्ट सोपवला आहे. या रिपोर्टमध्ये हत्येचा दावा पूर्पणणे फेटाळण्यात आला असून सुशांतने आत्महत्या केल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, एम्सचे डॉक्टर सुधीर गुप्ता यांनी सुशांतचा मृत्यू आत्महत्येमुळे झाला असून हत्येचा दावा फेटाळला असल्याचं सांगितलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 4, 2020 8:51 am

Web Title: ncb deputy director kps malhotra investigating drug angle in sushant death tests positive for coronavirus nck 90
Next Stories
1 अभिनेत्री मिष्टी मुखर्जीचं वयाच्या २७ व्या वर्षी निधन
2 ‘आधीच्या सरकारांनी कृषी सुधारणांचे धाडस दाखवले नाही’
3 काँग्रेसच्या काळात संरक्षणाकडे दुर्लक्ष
Just Now!
X