News Flash

‘नीट’ परीक्षा होणारच; सुप्रीम कोर्टाने सरकारची विनंती फेटाळली

या परीक्षेचा दुसरा टप्पा २४ जुलै रोजी होणार आहे.

नाहीत, असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी सरकारची विनंती फेटाळून लावली. त्यामुळे आता विद्यार्थ्यांनी २४ जुलै रोजी होणाऱ्या नीट परीक्षेला सामोरे जाणे अनिवार्य आहे.
‘नीट‘चा पहिला टप्पा १ मे रोजी पार पडला होता. या परीक्षेचा दुसरा टप्पा २४ जुलै रोजी होणार आहे. मात्र, पहिल्या टप्प्यात नीट न दिलेल्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा पुन्हा देता येईल, असे न्यायालयाने निकालात सांगितले आहे. या दोन्ही परीक्षांचा निकाल १७ ऑगस्ट रोजी जाहीर केला जाणार आहे. या परीक्षेच्या सक्तीस महाराष्ट्र, तमिळनाडू, कर्नाटक या राज्यांनी विरोध दर्शविला होता.
विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बाब एवढीच की,  ‘नीट १’ देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना ‘नीट २’ परीक्षेला बसण्याची संधी मिळणार आहे. त्याचप्रमाणे ज्यांच्या मते ‘नीट १’ परीक्षा व्यवस्थित पार पडली नाही किंवा परीक्षेची पूर्ण तयारी झाली नव्हती, त्या विद्यार्थ्यांनाही नीट २ देण्यास संमती देण्यात आली आहे. मात्र त्यासाठी नीट १ ची उमेदवारी रद्द करावी लागणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 9, 2016 9:14 pm

Web Title: neet stands no separate medical entrance exam in states says supreme court
टॅग : Cet,Exam
Next Stories
1 कलिंगड चोरले म्हणून दोन मुलांना विवस्त्र फिरवले
2 घरात पडल्याने दृष्टिहिन वृद्धेची दृष्टी परतली
3 कागदपत्रे प्रमाणित केल्याचा सुब्रमण्यम स्वामींचा दावा उपसभापतींनी फेटाळला
Just Now!
X