News Flash

नेपाळमध्ये हेलिकॉप्टर कोसळले

हेलिकॉप्टरमध्ये एक वैमानिक व सहा प्रवासी होते. निश्चल के सी हे वैमानिक असून पाच नेपाळी आणि एक जपानचा नागरिक असे सात जण

उत्तर प्रदेशच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) नागपूरमध्ये मोठी कारवाई केली आहे. नागपूर येथील डीआरडीओच्या यूनिटमधून पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच्या एजंटला अटक केली आहे.

नेपाळमध्ये हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना शनिवारी सकाळी घडली असून हेलिकॉप्टरमध्ये ६ प्रवासी आणि १ वैमानिक असे सात जण होते. हेलिकॉप्टर काठमांडूपासून ८० किलोमीटर अंतरावर कोसळले असून पावसामुळे मदत कार्यात अडथळे येत आहेत. सरकारी यंत्रणांनी प्रवाशांबाबत कोणतीही माहिती दिलेला नाही.

‘ऑल्टिट्यूड एअर’ या कंपनीचे हेलिकॉप्टर एका रुग्णाला आणण्यासाठी समगौन येथे गेले होते. मात्र, उड्डाणाच्या काही वेळाने हेलिकॉप्टरचा संपर्क तुटला. दुपारी हेलिकॉप्टर सापडले असून हेलिकॉप्टर नुवाकोट जिल्ह्यातील दुर्गम भागात कोसळले. हेलिकॉप्टरमध्ये एक वैमानिक व सहा प्रवासी होते. निश्चल के सी हे वैमानिक असून पाच नेपाळी आणि एक जपानचा नागरिक असे सात जण हेलिकॉप्टरमध्ये होते. या प्रवाशी बचावले की त्यांचा या घटनेत मृत्यू झाला, याबाबत कोणतीही मिळू शकलेली नाही. पाऊस आणि खराब हवामानामुळे बचाव कार्यात अडथळे येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. नेपाळचे सैन्य आणि अन्य पथक घटनास्थळी रवाना झाले आहेत. हेलिकॉप्टर कोसळले असले तरी अद्याप हेलिकॉप्टरने पेट घेतलेला नाही, असे सूत्रांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2018 2:43 pm

Web Title: nepal helicopter crashes in nuwakot seven people on board
Next Stories
1 भारताविरोधात चीनचा नवा डाव, नेपाळसाठी खुली केली बंदरं
2 समलैंगिक विवाहांना केंद्र सरकारचा विरोध
3 भारतवापसीवर विजय मल्ल्या म्हणाला, ते तर न्यायालयच ठरवेल
Just Now!
X