News Flash

मी अमित शाहंचं नावही नाही घेतलं, सीबीआयनं ते घुसडलं – सोहराबुद्दिन शेखचा भाऊ

मी माझ्या जबानीत पोलीस अधिकारी अभय चुडामासा आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा यांची नावे घेतली नव्हती. सीबीआयने स्वत:हून या दोन नावांचा माझ्या जबानीमध्ये समावेश केला

मी माझ्या जबानीत पोलीस अधिकारी अभय चुडामासा आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा यांची नावे घेतली नव्हती. सीबीआयने स्वत:हून या दोन नावांचा माझ्या जबानीमध्ये समावेश केला असा दावा नयामुद्दीन शेखने विशेष सीबीआय न्यायालयासमोर केला आहे. नयामुद्दीन सोहराबुद्दीन शेखचा लहान भाऊ आहे. तो सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरणातील एक साक्षीदार आहे. सीबीआय अधिकाऱ्यांनी २०१० साली नयामुद्दीनची साक्ष नोंदवली होती.

नयामुद्दीन २९ नोव्हेंबर २०१७ रोजी न्यायालयासमोर साक्षीसाठी हजर झाला पाहिजे होता. पण समन्स, अजामिनपात्र अटक वॉरंट बजावल्यानंतर नयामुद्दीन सोमवारी न्यायालयासमोर हजर झाला. या प्रकरणात ज्यांनी साक्ष फिरवली त्यांच्या आणि सीबीआय विरोधात एफआयआर नोंदवण्याची त्यांने कोर्टाला तोंडी विनंती केली. सीबीआयने या संपूर्ण खटल्याची वाट लावल्याचा त्याने आरोप केला. माझ्या जबानीमध्ये बरेच काही आहे जे मला सांगायचे आहे असे नयामुद्दीनने कोर्टाला सांगितले. मला भाजपाकडून कुठलाही धोका नाही.

मी कधीही आझम खानचे नाव ऐकले नाही. सीबीआयचे तपास अधिकारी दागर साहेब गावातील माझ्या घरी आले होते. मी त्यांच्यासमोर आझम खान मला भेटल्याचे किंवा अभय चुडामासा यांनी सर्वोच्च न्यायालयातून याचिका मागे घेण्यासाठी मला ५० लाख रुपये देऊ केले असे म्हटलेले नाही. २०१० सालच्या माझ्या जबानीत फेरफार करुन काही गोष्टींचा समावेश करण्यात आला. तसे मी कधीच म्हटले नव्हते यासंबंधी अहमदाबादमधील विशेष न्यायालयात मी प्रतिज्ञापत्रही सादर केले होते असे नयामुद्दीने विशेष सीबीआय न्यायालयाला सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2018 12:09 pm

Web Title: never named amit shah in my statement sohrabuddin brother
Next Stories
1 ८वी पास आमदारांचे वार्षिक उत्पन्न ९० लाख
2 पत्रकाराच्या वेशात आले दहशतवादी, मुलाच्या मृत्यूनंतर घरी आलेल्या जवानाची केली हत्या
3 खळबळजनक खुलासा ! ‘आम्हाला गुपचूप कळवा, मल्ल्याला ताब्यात घ्यायची गरज नाही’
Just Now!
X