ओकिनावाच्या दक्षिणेकडे जपानने लष्करी टेहळणी या आठवडय़ाच्या अखेरीस वाढवली आहे, चीनच्या बरोबर सध्या जपानचे तणावाचे संबंध आहेत.
जपानच्या लष्कराने रविवारी ओकिनावा बेटांवर इ-२ सी विमाने पाठवली, एकूण चार लढाऊ विमाने तेथील नाहा या तळावर पाठवण्यात आल्याचे जीजी व क्योडो या वृत्तसंस्थांनी म्हटले आहे. प्रथमच ही विमाने या बेटांवर आली आहेत.
विशेष म्हणजे नाहा बेटांवर जपानचे संरक्षण मंत्री इत्सुनोरी ओनोडेरा यांनी एक उद्घाटन कार्यक्रम केला, त्यात चीनकडून जपानला धोकादायक स्थितीचा सामना करावा लागत आहे. चीनने त्यांच्या सैन्याची जैसे थे स्थिती अनेकदा बदलली असून शांतता धोक्यात येईल असे प्रकार केले आहेत.
नाहा विमानतळावर स्क्वाडर्र्न या चार विमानांचा संच देशाच्या रक्षणासाठी सज्ज ठेवण्यात आला आहे. जपानच्या हवाई दलाकडे १३ ए २ सी ही खास लढाऊ विमाने आहेत. ती उत्तरेकडे मिसावा बेटांवर ठेवली आहेत.
विमाने सज्ज
त्यातील काही विमाने आता नाहा येथील तळावर आणली आहेत. मार्च २०१५ पर्यंत तेथील सैन्याधिकाऱ्यांची संख्या १३० पर्यंत वाढवण्यात येणार आहे. चिनी विमानांनी मार्च २०१३ मध्ये ४१५ वेळा हद्द ओलांडली होती. गेल्यावर्षी त्यांनी ३०६ वेळा हद्द ओलांडली होती.  त्यामुळे जपानने हा निर्णय घेतला. योनागुनी येथे जपानने रडार टेहळणीची व्यवस्था केली आहे. टोकियोच्या नियंत्रणात असलेल्या सेनाकाकू बेटांवर चीन दावा करीत असून त्या बेटांना चीनने डायोस असे नाव दिले आहे.
चीन संतप्त
चीनची अनेक जहाजे या वादग्रस्त बेटांकडे नेहमी येत असतात. जपानने सेनाकाकू बेटांपैकी काहींचे राष्ट्रीयीकरण केले असून त्यामुळे चीन आणखी खवळला असून विमानेही त्यांच्या हद्दीत पाठवत आहे. रडार यंत्रणा सांभाळण्यासाठी १६० कर्मचारी २०१६ पर्यंत तैनात करण्यात येणार आहेत असे जपानने म्हटले आहे.