News Flash

Coronavirus: देशात नव्या ६०,७५३ बाधितांची भर, मृतांचा आकडा अजूनही हजारच्या वरच!

गेल्या काही दिवसापासून आकडे कमी होताना दिसत आहेत. मात्र धोका अद्यापही टळलेला नाही, त्यामुळे काळजी घेणे आवश्यकच!

आरोग्य मंत्रालयाने गेल्या २४ तासातली देशातली करोना आकडेवारी जाहीर केली आहे.

देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर सध्या सुरुच आहे. नव्या बाधितांची, मृतांची संख्या जरी कमी होत असली तरी अजूनही रुग्णवाढ होत आहेच. आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेले आकडे हे सांगत आहेत.

देशात गेल्या २४ तासांत ६०हजार ७५३ नव्या बाधितांची नोंद झाली. त्यामुळे देशातल्या उपचाराधीन रुग्णांची संख्या आता सात लाख ६० हजार १९ वर पोहोचली आहे. तर गेल्या २४ तासांमध्ये देशातले ९७ हजार ७४३ रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे आत्तापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या दोन कोटी ८६ लाख ७८ हजार ३९० वर पोहोचली आहे.

देशात गेल्या २४ तासांत १,६४७ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे आत्तापर्यंतचा करोनामृत्यूंचा आकडा आता तीन लाख ८५ हजार १३७ वर पोहोचला आहे.

देशात गेल्या २४ तासात ३३ लाख ८५ नागरिकांनी करोना प्रतिबंधक लस घेतली. त्यापैकी २९ लाख १३ हजार २१९ जणांनी पहिला डोस घेतला. तर दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या तीन लाख ८६ हजार ८६६ इतकी आहे. त्यामुळे लस घेतलेल्या नागरिकांची एकूण संख्या आता २७ कोटी २३ लाख ८८ हजार ७८३ वर पोहोचली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 19, 2021 10:30 am

Web Title: new covid 19 cases in india today corona cases in india update coronavirus in india vsk 98
Next Stories
1 बापरे… वीज विभागाने पाठवलं ९० कोटींचं बिल
2 ‘समूह प्रतिकारशक्ती’पासून  देश अद्याप दूरच!
3 ट्विटरची धोरणे देशातील  कायद्यापेक्षा श्रेष्ठ नाहीत!
Just Now!
X