News Flash

दूरस्थ दीर्घिकांमध्ये मोठय़ा प्रमाणात तारकांची निर्मिती

बहुतांश तारे जेथे दीर्घिकेचे वस्तुमान जास्त असते तेथे मेन सिक्वेन्सवर असतात.

तेथे नवीन तारे निर्माण करण्याची क्षमता जास्त असते.

अटाकामातील रेडिओ दुर्बिणीच्या मदतीने संशोधन

नऊ अब्ज वर्षांपूर्वी काही दीर्घिका या अतिशय वेगाने ताऱ्यांना जन्म देत होत्या व त्या आताच्या दीर्घिकांपेक्षा फारच कार्यक्षम होत्या असे संशोधकांनी म्हटले आहे. बहुतांश तारे जेथे दीर्घिकेचे वस्तुमान जास्त असते तेथे मेन सिक्वेन्सवर असतात. तेथे नवीन तारे निर्माण करण्याची क्षमता जास्त असते. असे असले तरी प्रत्येकवेळी जेव्हा नवीन ताऱ्यांचा स्फोट होतो तेव्हा तो भाग इतर भागापेक्षा जास्त प्रकाशमान दिसतो. दोन मोठय़ा दीर्घिकांची टक्कर ही तारकास्फोटाची स्थिती निर्माण करते त्या भागात महाकाय रेणवीय ढगात शीत वायू असतात व ते तारकानिर्मितीचे इंधन असते.
खगोलवैज्ञानिकांनी असा प्रश्न केला आहे की, सुरुवातीच्या विश्वातील तारकास्फोट हे मोठय़ा वायू पुरवठय़ामुळे होतात किंवा दीर्घिकांमध्ये वायू निर्मिती होत असल्याने होतात. कावली इन्स्टिटय़ूट फॉर द फिजीक्स अँड मॅथेमेटिक्स ऑफ द युनिवर्स या संस्थेचे जॉन सिल्वरमन यांच्या नेतृत्वाखाली सात दीर्घिकांतील कार्बन मोनॉक्साईड या वायूचा अभ्यास करण्यात आला. त्यावेळी विश्व चार अब्ज वर्षे वयाचे होते. चिलीतील माउंटनटॉप येथे अटाकामा लार्ज मिलीमीटर अ‍ॅरे या ठिकाणी त्याचा अभ्यास करण्यात आला. काही मिलीमीटर लांबीच्या विद्युतचुंबकीय तरंगलांबीच्या लहरींचा शोध यात घेण्यात आला. संशोधकांच्या मते कार्बन मोनॉक्साईड वायूचे प्रमाण ताऱ्यांच्या निर्मितीचा वेग जास्त असतानाही कमी होताना दिसले. या निरीक्षणांचा संबंध पृथ्वीनजीकच्या तारकास्फोट होत असलेल्या दीर्घिकांचे जे निरीक्षण करण्यात आले त्याच्याशी असून त्यात काही साम्यस्थळे आहेत. यात वायू कमी होण्याचा वेग हा अपेक्षेइतका नव्हता. संशोधकांच्या मते मेन सिक्वेन्स या भागात ताऱ्यांच्या निर्मितीचा वेग किती जास्त असतो यावर त्या र्दीघिकेची कार्यक्षमता अवलंबून आहे. अ‍ॅस्ट्रोफिजिकल जर्नल लेटर्स या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 18, 2015 2:14 am

Web Title: new star invention in galaxy
टॅग : Galaxy
Next Stories
1 दिल्लीत अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार
2 ‘दादरी’मुळे मोदींची प्रतिमा मलिन
3 आयोगाचे सदस्य आज पाटण्यात
Just Now!
X