News Flash

मशिदीवरील गोळीबाराच्या घटनेनंतर न्यूझीलंडमध्ये स्वयंचलित रायफल्सवर बंदी

न्यूझिलंडच्या ख्राईस्टचर्च येथील मशिदीवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेत ४९ लोकांचा मृत्यू झाला होता.

न्यूझीलंडच्या ख्राईस्टचर्च येथील मशिदीवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेत ४९ लोकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या देशात शस्त्रांवर बंदी घालण्याची मागणी होत होती. त्यानुसार, पंतप्रधान जेसिंडा अर्डन यांनी सेमी ऑटोमॅटिक रायफलींच्या विक्रीवर बंदीची घोषणा केली आहे.


अर्डन यांनी म्हटले की, आम्ही सर्व सेमी ऑटोमॅटिक रायफल, उच्च क्षमतेच्या मॅगझिन्स आणि त्यांच्या पार्ट्सवर प्रतिबंध घालत आहोत. ज्यामुळे कोणतेही हत्यार अधिक जास्त घातक बनवले जाऊ नये.

हा हल्ला घडवून आणणाऱ्या व्यक्तीचा जन्म ऑस्ट्रेलियात झाला आहे. त्याने गुरुवारी रात्री आपल्या फेसबूक पोस्टच्या माध्यमातून या हल्ल्याची माहिती दिली होती. आपल्या कटाची माहिती त्याने ३७ पानांच्या एका जाहिरनाम्याद्वारे प्रसिद्ध केली होती. या जाहिरनाम्याला त्याने ‘द ग्रेट रिप्लेसमेंट’ असे नाव दिले होते.

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी शुक्रवारी स्पष्ट केले होते की, न्यूझीलंडच्या कैदेत असलेली ती व्यक्ती ऑस्ट्रेलियाची नागरिक आहे. मॉरिसन यांनी म्हटले की, ती व्यक्ती उजव्या कट्टरवादी विचारसरणीची दहशतवादी आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलिया सरकारने याप्रकरणी चौकशीसाठी न्यूझिलंडला संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.

या हल्ल्याच्या व्हिडिओत दिसत असलेली व्यक्ती लाईव्ह प्रसारणात हेल्मेटवरील कॅमेऱ्याचा वापर केला होता. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ फेसबुकवर प्रसारीत झाला आहे. यामध्ये लोकांना निवडून त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. हल्लेखोराने आपल्या कारमधून जात मशिदीवर हल्ला करुन तिथून बाहेर पडतानाचा संपूर्ण व्हिडिओ प्रसारित केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 21, 2019 10:18 am

Web Title: new zealand will ban all military style semi automatic weapons
Next Stories
1 ‘वेलकम पार्टी’ बेतली जिवावर, इस्लामविरोधी कृत्य ठरवत विद्यार्थ्याने केली प्राध्यापकाची हत्या
2 मॉर्निंग बुलेटीन: पाच महत्त्वाच्या बातम्या
3 PNB Scam: सतर्क बँक कर्मचाऱ्यामुळेच पोलिसांच्या जाळ्यात अडकला नीरव मोदी
Just Now!
X