19 January 2021

News Flash

पुढची १० ते २० वर्षे मोदींना पर्याय नाही, बाबा रामदेव यांचं वक्तव्य

राहुल गांधी यांना दिला त्रियोग करण्याचा सल्ला

पुढची १० ते २० वर्षे नरेंद्र मोदींना पर्याय नाही असं वक्तव्य योगगुरु बाबा रामदेव यांनी केलं आहे. मी मोदींचा भक्त नाही पण एक राष्ट्रभक्त नक्कीच आहे. एवढंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील राष्ट्रभक्त आहेत त्यामुळे पुढची १० ते २० वर्षे त्यांना काहीही पर्याय नाही असं बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी यांनी त्रियोग करावा तर काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी मौन योग करावा असा खोचक सल्लाही बाबा रामदेव यांनी दिला आहे.

news 18 india ला दिलेल्या मुलाखतीत बाबा रामदेव यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता की देशात मोदी फॅक्टर आहे का? त्यावेळी त्यांनी उत्तर दिलं की, “कोट्यवधी लोकांना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास आहे. त्यांच्यात आणि इतर राजकारण्यांमध्ये जमीन आस्मानाचा फरक आहे. सगळ्या देशाला हे ठाऊक आहे की मोदींना स्वतःसाठी काहीही नको आहे जे काही करायचं आहे ते देशासाठी करायचं आहे. प्रभू कृपेने त्यांना हे सगळं काही मिळालं आहे. ” असंही बाबा रामदेव म्हणाले. इतकंच नाही तर भारताच्या राजकारणात सध्या पुढच्या १० ते २० वर्षांसाठी तरी मला मोदींना कोणताही पर्याय आहे असं दिसत नाही.

तुम्ही मोदी भक्त आहात असा आरोप तुमच्यावर होतो असं जेव्हा बाबा रामदेव यांना विचारण्यात आलं तेव्हा ते म्हणाले की मी मोदीभक्त नाही तर राष्ट्रभक्त आहे. मी प्रभू, गाव, गरीब, मजूर, शेतकरी, दलित, शोषित, वंचित, मागासवर्गीय यांचा भक्त आहे. मी योगी आहे आणि कर्मयोगी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रभक्त आहेत त्यामुळे मी त्यांचा सहयोगी आहे. असं उत्तर बाबा रामदेव यांनी दिलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2020 10:47 am

Web Title: next ten twenty years no option narendra modi says yoga guru baba ramdev scj 81
टॅग Narendra Modi
Next Stories
1 राजधानी दिल्लीत प्रदुषणाची स्थिती गंभीर, बंदी असूनही फोडण्यात आले फटाके
2 हजारो ट्रम्प समर्थक वॉशिंग्टन डीसीत एकत्र; राष्ट्राध्यक्षपदाच्या निकालाचा केला निषेध
3 रामाचे राज्य येऊनही करोनाचा रावण मारला जात नाही, संजय राऊत यांचा मोदींना टोला
Just Now!
X