News Flash

‘एनआयए’ची ‘एफबीआय’सह अन्य यंत्रणांकडे सहकार्याची मागणी

राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) अमेरिकेच्या ‘एफबीआय’सह अन्य काही देशांच्या तपास यंत्रणांशी संपर्क साधला आहे.

| April 7, 2016 01:31 am

पठाणकोट दहशतवादी हल्ला
पठाणकोट हवाई दलाच्या तळावरील दहशतवादी हल्ल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) अमेरिकेच्या ‘एफबीआय’सह अन्य काही देशांच्या तपास यंत्रणांशी संपर्क साधला आहे.
पठाणकोट हल्ल्याचा तपास करण्यासाठी एनआयएच्या पथकाला पाकिस्तानात तपासाची मुभा देण्याबाबत पाकिस्तानकडून औपचारिक प्रतिसाद मिळालेला नसतानाच एनआयएने अन्य देशातील तपास यंत्रणांच्या सहकार्याची मागणी केली आहे.
या हल्ल्यानंतर त्वरितच अब्दुल रौफ याने अलकलाम डॉट कॉम आणि रंगोनूर डॉट कॉम या संकेतस्थळांवरून व्हिडीओद्वारे हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. त्या संकेतस्थळांचे सव्‍‌र्हर प्रोव्हायडर अमेरिकेतील होते.
पाकिस्तानचे संयुक्त तपास पथक गेल्या आठवडय़ात भारतात येण्यापूर्वीच अलकलाम डॉट कॉम हे बंद करण्यात आले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 7, 2016 1:31 am

Web Title: nia approaches fbi other probe agencies for pathankot probe
टॅग : Pathankot Attack
Next Stories
1 नीरा राडिया यांची कंपनी स्थापन करण्यास मोझॅक फोन्सेकाची मदत
2 राष्ट्रपती राजवटीवरच्या आव्हान याचिकेची सुनावणी लांबणीवर टाकण्यास नकार
3 .. तरीही आसामसाठी काम सुरू ठेवणार – गडकरी
Just Now!
X