News Flash

लष्करी तळावर हल्ला करणाऱ्या सहा दहशतवाद्यांना अटक

लष्कराच्या तळावर हल्ला करणाऱ्या सहा दहशतवाद्यांना सुरक्षरक्षकांनी अटक केली

जैश-ए -मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या आत्मघातकी पथकातील १७ वर्षीय मोहम्मद सादिक याला गुरुवारी बारामुल्ला जिल्ह्य़ात अटक करण्यात आली.

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तंगधर येथील लष्कराच्या तळावर हल्ला करणाऱ्या सहा दहशतवाद्यांना सुरक्षरक्षकांनी अटक केली असून त्यामध्ये पाकिस्तानच्या एका दहशतवाद्याचा समावेश आहे.
पाकिस्तानातून एक दहशतवादी बारामुल्ला जिल्ह्य़ात घुसला असल्याची खबर मिळाल्यावरून सुरक्षारक्षकांनी या जिल्ह्य़ात शोधमोहीम हाती घेतली. त्या वेळी पाकिस्तानातील सियालकोटचा रहिवासी असलेल्या जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी मोहम्मद सादिक याला अटक करण्यात आली. त्याचप्रमाणे अन्य पाच दहशतवाद्यांनाही अटक करण्यात आली आहे.
मोहम्मद सादिकची चौकशी केली असता त्याने सांगितले की, तो जैशच्या आत्मघातकी पथकाचा सदस्य असून या संघटनेने तंगधरमधील लष्कराच्या तळावर हल्ला केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2016 2:32 am

Web Title: nia arrested 6 suspected terrorists
टॅग : Terrorists
Next Stories
1 कालिखो पुल सरकारने विश्वास ठराव जिंकला
2 पाकिस्तानातील २५४ मदरसे बंद
3 रेल्वे खुल्या बाजारातून २० हजार कोटी उभारणार!
Just Now!
X