23 September 2020

News Flash

‘निसान’ मोटर्सच्या संचालकांना अटक

जपानची कार कंपनी निसान मोटर्सचे संचालक कार्लोस घोसन (64)यांना अटक

(कार्लोस घोसन)

जपानची कार कंपनी निसान मोटर्सचे संचालक कार्लोस घोसन (64)यांना अटक करण्यात आली आहे. आर्थिक उत्पन्न लपवल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

जपानमधील वृत्तपत्र ‘योमीउरी’ने सोमवारी याबाबतचं वृत्त दिलं. कंपनीच्या पैशांचा वापर वैयक्तिक कामांसाठी केल्याचा आरोप घोसन यांच्यावर आहे. घोसन आणि निसान कंपनीचे अध्यक्ष ग्रेग कैली यांच्याविरोधात गेल्या अनेक महिन्यांपासून चौकशी सुरू होती, अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. टोकियोमधील तपास अधिकाऱ्यांनी घोसन यांना अटक केली. निसान कंपनीनेही कार्लोस यांच्यावरील आरोप खरे असल्याचे सांगितले आहे. तसंच कंपनी त्यांना आता बाहेरचा रस्ता दाखवण्याच्या विचारात असल्याचंही समजतंय. लवकरच त्यांची हकालपट्टी होणार असल्याचं समजतंय. कार्लोस यांच्यासह निसान कंपनीचे अध्यक्ष ग्रेग कैली हेदेखील चौकशीच्या फेऱ्यात असल्याची माहिती आहे. मात्र, टोकियोतील तपास अधिकाऱ्यांनी याबाबत अद्याप माहिती दिलेली नाही.

2001 मध्ये कार्लोस हे निसानचे सीईओ बनले. याशिवाय फ्रान्समधील ऑटो कंपनी रिनॉल्टचेही ते चेअरमन आहेत. डबघाईला आलेल्या निसान कंपनीला वाचविण्याचे काम कार्लोस यांनी केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2018 1:20 pm

Web Title: nissan motors chairman carlos ghosn has been arrested
Next Stories
1 सभा न घेण्यासाठी काँग्रेसकडून २५ लाखांची ऑफर: ओवेसी
2 भारतात मलेरियाच्या आजारात घट; WHOच्या अहवालातील माहिती
3 जम्मू- काश्मीरमध्ये हुर्रियत नेत्याची हत्या
Just Now!
X