काल पुण्यात एका बॅंकेच्या कार्यक्रमात माझ्या भाषणाचा विपर्यास करण्यात आला आहे. यातून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम केले जात आहे. असा खुलासा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत केला. तर आगामी 2019 च्या निवडणुका पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालीच होणार असून या निवडणुकीत आम्ही बहुमताने निवडून येऊ. तसेच आपण पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, शहर अध्यक्ष योगेश गोगावले हे पत्रकार परिषदेला उपस्थित होते. यावेळी नितीन गडकरी म्हणाले की, जी गोष्ट मी कधीच बोललो नाही. ते माझ्या नावाने खपवणे चुकीचे आहे. तसेच काल पुणे जिल्हा नागरी सहकारी बँकेच्या कार्यक्रमात आपण बोललेल्या वक्तव्याचा विपर्यास लावला जात असल्याने आपण ही पत्रकार परिषद घेतली आहे. यापूर्वी देखील किमान तीन वेळा माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला आहे. तोडून मोडून वाक्य छापण्यात आले आहे. ही दुर्दैवी बाब असून असच वारंवार होत राहील्यास बोलण कठिण होईल. अशी भूमिका त्यांनी मांडली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 23, 2018 6:33 pm