करोना महामारीच्या काळात लॉकडाउ दरम्यान रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती. मात्र जसजशी परिस्थिती सामान्य होऊ लागली तसं रेल्वेकडून काही रेल्वे देखील सुरू करण्यात आल्या. त्यानंतर आता एप्रिलपासून रेल्वेसेवा पूर्वीप्रमाणे सुरळीत होणार असल्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेकडून एका महत्वपूर्ण माहिती देण्यात आली आहे.

माध्यमांवरील काही बातम्यांमधून असा दावा केला जात आहे की, एप्रिलमधील एका तारखेपासून सर्व प्रवसी रेल्वे पूर्ण क्षमतेने धावतील. मात्र, रेल्वे मंत्रालायाबरोबरच पीआयबीने देखील अशा बातम्यांचे खंडन केले आहे. रेल्वेने लोकांना व माध्यम संस्थांना आवाहन केलं आहे की, त्यांनी रेल्वे सेवेबद्दलच्या अशाप्रकारचे अंदाज वर्तवू नयेत. यासाठी अद्याप कोणतीच तारीख निश्चित करण्यात आलेली नाही. या संदर्भात जर काही निर्णय होत असेल तर सर्वांनाच त्याबाबत माहिती दिली जाईल.

या पार्श्वभूमीवर रेल्वेकडून सांगण्यात आले आहे की, सर्व रेल्वे पूर्वीप्रमाणे सुरू करण्यासाठी कोणतीही तारीख निश्चित करण्यात आलेली नाही. रेल्वेकडून श्रेणीबद्धरित्या रेल्वेंची संख्या वाढवली जात आहे. अगोदरपासूनच ६५ टक्क्यांपेक्षा अधिक रेल्वे सुरू असून, यामध्ये एकट्या जानेवारी महिन्यात २५० पेक्षा जास्त रेल्वेंची वाढ झाली आहे. हळूहळू आणखी वाढवल्या जातील.

देशातील परिस्थिती झपाट्याने पूर्वपदावर येत आहे. मात्र असे जरी असले तरी भारतीय रेल्वे आतापर्यंत लॉकडाउनच्या अगोदर असलेल्या स्थितीत येऊ शकलेली नाही.
रेल्वेकडू सांगण्यात आले आहे की, सर्व घटकांवर विचार केल्यानंतर सर्व भागधारकांशी चर्चा होईल आणि त्यानंतरच रेल्वे सेवा पूर्वीप्रमाणे सुरळीत करण्याबाबत निर्णय घेतला जाईल.