नातेवाईकांकडून भेटीच्या स्वरूपात मिळालेली रोख रक्कम करमुक्त करण्यात आली आहे. प्राप्तिकर विभागाने करदात्यांना मोठा दिलासाच दिला आहे, असे म्हणता येईल. नातेवाईकांकडून मिळालेली रोख रक्कम तुम्ही बँकेत भरायला गेलात तर तुम्हाला त्यावर कोणत्याही प्रकारचा कर लागणार नाही. मात्र ही रक्कम तुम्ही तुमच्या उत्पन्नात समाविष्ट केलीत तर मात्र त्यावर कर भरावा लागेल. प्राप्तिकर विभागाने या संदर्भातले निर्देश जारी केले आहेत. त्यामुळे भेटीच्या स्वरूपातील रोख रकमेवर कोणताही कर यापुढे लागणार नाही. रकमेची काय मर्यादा आहे हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही.

डेबिट म्युच्युअल फंडवर मिळणाऱ्या भांडवली लाभावरचा कर हा त्याच्या मुदतीवर अवलंबून असणार आहे. भांडवली लाभाची मुदत जर तीन वर्षांपेक्षा जास्त असेल तर त्यावर निश्चितपणे कर लागू होईल असेही स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच भांडवली लाभाचा कालावधी तीन वर्षांपेक्षा कमी असेल तर त्यावर किमान २० टक्के कर लागू होण्याची शक्यता आहे.

कॉम्पोजिशन स्कीम ही लघु करदात्यांसाठी लागू करण्यात आलेली योजना आहे. ज्या लघुउद्योजकांचे वार्षिक उत्पन्न १ कोटी रूपये किंवा त्यापेक्षा कमी आहे, असे उद्योजक या योजनेत येतात. (काही राज्यांमध्ये ही मर्यादा ७५ लाख रूपये आहे) या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे. लघुउद्योजकांना यासाठी जीएसटी भरावा लागणार असून, त्यासाठीच्या अटी खालीलप्रमाणे आहेत.

कॉम्पोजिशन योजनेची निवड करणारी व्यक्ती आंतर-राज्यीय पुरवठा करू शकणार नाही
ज्या उद्योजकाने कॉम्पोजिशन योजनेची निवड केली आहे त्याला पुरवठ्याचे बिल द्यावे लागेल
ही योजना निवडणाऱ्या करदात्याने जीएसटी रिटर्न दर तीन महिन्यांनी भरणे आवश्यक आहे