18 February 2020

News Flash

ओबामांना माकड म्हटल्याबद्दल उत्तर कोरियाला दणका

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे उष्णकटीबंधीय जंगलातील माकडासारखे बेदरकार वागतात, त्यांची वक्तव्येही तशीच अविचारीपणाची असतात, या टीकेची मोठी किंमत शनिवारी उत्तर कोरियाला मोजावी लागली.

| December 29, 2014 01:15 am

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे उष्णकटीबंधीय जंगलातील माकडासारखे बेदरकार वागतात, त्यांची वक्तव्येही तशीच अविचारीपणाची असतात, या टीकेची मोठी किंमत शनिवारी उत्तर कोरियाला मोजावी लागली. अमेरिकनेने कोरियातील इंटरनेट बंद पाडण्याचे प्रयत्न केले.
उत्तर कोरियातील हुकूमशाहीत प्रबळ असलेल्या ‘नॅशनल डिफेन्स कमिशन’ने या चित्रपटावर व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेनंतर सुरू झालेले ‘इंटरनेटयुद्ध’ रोखण्यासाठी कडक उपाययोजना करण्याचा इशारा दिला आहे. उत्तर कोरियातील इंटरनेटमध्ये व्यत्यय आणले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. ‘द इंटरव्ह्य़ू’ हा चित्रपट दाखवणाऱ्या ‘सोनी पिक्चर्स’चे ‘हॅकिंग’ उत्तर कोरियाने केले, असे अमेरिकेचे म्हणणे आहे.
रविवारी सायंकाळी उत्तर कोरियातील दूरसंचार सेवा थंडावली होती. सायंकाळी साडेसात वाजता  इंटरनेट, ३ जी मोबाइल नेटवर्क बंद पडले ते रात्री साडेनऊपर्यंत सुरळीत झाले. दिवसभर इंटरनेट सेवा विस्कळीत होती. इंटरनेट ब्लॅकआउट हा देशभरात होता. उत्तर कोरियात १० लाख संगणक आहेत.

First Published on December 29, 2014 1:15 am

Web Title: north korea calls obama monkey suffers new internet outage
Next Stories
1 छायाचित्र-पत्रकार राजन देवदास कालवश
2 इंडोनेशियाजवळ १६२प्रवाशांसह विमान बेपत्ता
3 दाऊदला आमच्या ताब्यात द्या
Just Now!
X