News Flash

धक्कादायक! मोबाईलवर बोलण्याच्या नादात नर्सने महिलेला दिली दोनदा लस!

मोबाईलवर बोलण्याच्या नादात नर्सने एका महिलेला दोनदा करोनाची लस दिल्याचा प्रकार घडला आहे.

संग्रहित छायाचित्र

देशभरात ४५ वर्षांच्या वरच्या सर्व नागरिकांना करोनाची लस द्यायला मान्यता मिळाली आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने आता नागरिकांना लस द्यायला सुरुवात झाली आहे. अशाच लसीकरणावेळी उत्तर प्रदेशमध्ये गंभीर प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. फोनवर बोलण्यात गुंग असलेल्या एका नर्सनं महिलेला करोनाची लस दोनदा दिल्यामुळे सदर महिलेचा हात दुखू लागल्यानंतर हा प्रकार उघड झाला. उत्तर प्रदेशच्या कानपूरमधल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये हा प्रकार घडला आहे. यानंतर संबंधित नर्सविरोधात तक्रार करण्यात आली असून या प्रकरणाची आरोग्य उच्चाधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात येत आहे.

नेमकं झालं काय?

कानपूरच्या या लसीकरण केंद्रावर सदर महिला लस घेण्यासाठी गेली असता तिची नोंदणी करण्यात आली. मात्र, तिला लस देणारी नर्स फोनवर बोलत होती. लसीचा पहिला डोस दिल्यानंतर संबंधित नर्सने कागदपत्रे तयार केली. फोनवर बोलतच तिने त्याच महिलेला पुन्हा एकदा लसीचा डोस दिला. यानंतर महिलेला हातात दुखू लागल्यानंतर लस दिलेल्या ठिकाणी सूज आल्याची तक्रार महिलेने केली. तसेच, लसीचे दोन डोस का दिले? अशी विचारणा ही महिला करू लागली, तेव्हा घडलेला सगळा प्रकार लक्षात आला.

आरोग्य अधिकाऱ्याकडे तक्रार

दरम्यान, या सगळ्या प्रकाराच्या निषेधार्थ महिलेच्या नातेवाईकांनी मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केल्याचं या वृत्तात म्हटलं आहे. या प्रकरणी आता पुढील तपास सुरू आहे. मात्र, सदर महिलेला दोन लागोपाठ डोस दिल्यामुळे काही अतिरिक्त त्रास जाणवला किंवा नाही, याविषयी अधिक माहिती मिळू शकलेली नाही.

Corona Vaccine: दुसरा डोस घेताना ही चूक करू नका!

भारतात गेल्या महिन्याभरात मोठ्या संख्येने करोनाचे नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात सापडत आहेत. देशाचा विचार करता शुक्रवारी देशात ८९ हजार १२९ नवे करोनाबाधित सापडले असून ७१४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच, ४४ हजार २०२ रुग्ण बरे झाल्याची आकडेवारी आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2021 7:59 pm

Web Title: nurse on mobile injects twice corona vaccine dose to a women pmw 88
टॅग : Corona
Next Stories
1 “नंदीग्राममधून निवडणूक लढवणं ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक”, पंतप्रधानांची खोचक टीका!
2 करोनाची लस घेतल्यानंतर मद्यपान केल्यास विपरीत परिणाम होतात का? वाचा काय म्हणतायत तज्ज्ञ!
3 छत्तीसगड – नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत पाच जवान शहीद ; दहा जखमी
Just Now!
X