माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांना सार्वजनिक सुरक्षा कायद्यान्वये (पीएसए) स्थानबद्ध करण्याच्या निर्णयाला अब्दुल्ला यांची बहिण सारा अब्दुल्ला पायलटने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

नागरिकांवर असलेला ‘लक्षणीय प्रभाव’ हे कारण माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांना सार्वजनिक सुरक्षा कायद्यान्वये (पीएसए) स्थानबद्ध करण्याच्या समर्थनार्थ देण्यात आले आहे. वरिष्ठ वकिल कपिल सिब्बल ओमर अब्दुल्ला यांच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात युक्तीवाद करणार आहेत. या आठवडयाच्या आत सुनावणीची तारीख देण्याची मागणी केली आहे. पीएसए अंतर्गत नव्याने स्थानबद्ध करण्याचा आदेश अंसैवेधानिक आणि मूलभूत हक्काचे उल्लंघन असल्याचे ओमर अब्दुल्ला यांच्या बहिणीने म्हटले आहे.

आणखी वाचा – जनतेतील प्रभावामुळे ओमर यांची स्थानबद्धता

पोलिसांनी ओमर अब्दुल्ला यांच्याविरुद्ध पीएसएअन्वये कारवाईसाठी तयार केलेल्या फाईलमध्ये ओमर यांचा नागरिकांवर असलेला प्रभाव त्यातून त्यांच्या मतदानावर बहिष्कार घालण्याच्या आवाहनाला मिळालेला प्रतिसाद याचा उल्लेख आहे. ओमर यांनी अनुच्छेद ३७० व ३५ ए रद्द करण्याच्या विरोधात सामान्य लोकांना भडकावण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले आहे.