पूर्व लडाखमध्ये एलएसीवर चीनकडून सातत्याने नवीन योजना आखल्या जात आहेत. चीनने तरुण तिबेटींना पीपल्स लिबरेशन आर्मीमध्ये (PLA) सामील करण्यासाठी प्रयत्न वाढवले ​​आहेत. तिबेटी तरुणांनी सैन्यात भरती व्हावे आणि सीमेवर मार्गदर्शक म्हणून काम करावे, अशी चीनची इच्छा आहे. चीनच्या वतीने, आपले लष्कर बळकट करणे आणि त्याचे एअरबेस अपग्रेड करण्याचे काम सतत सुरु आहे. दरम्यान, चीन आता जबरदस्तीने तिबेटियन लोकांना सैनिक बनवण्यासाठी उतावळा झाला आहे. चीनने तिबेटियन कुटुंबातील प्रत्येक सदस्याला सैनिक बनणे बंधनकारक केले आहे. हे सैनिक पीपल्स लिबरेशन आर्मीमध्ये भरती होणार आहेत, असे सांगितले जात आहे की चीन या तिबेटियन सैनिकांचा प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) भारताच्या विरोधात वापर करेल.

या तिबेटियन युवकांना PLA मध्ये सामील होण्यासाठी निष्ठा चाचणीतून जावे लागत आहे. ‘इंडिया टुडे’ ने आपल्या वृत्तात म्हटले आहे की चीनला कोणत्याही किंमतीत एलएसीवरील आपले स्थान मजबूत करायचे आहे. म्हणूनच प्रत्येक तिबेटी कुटुंबातील एका सदस्याला पीएलएमध्ये दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. असेही सांगितले जात आहे की तो या तिबेटियन सैनिकांना LAC जवळ, विशेषत: भारतासह लडाख आणि अरुणाचल प्रदेशच्या सीमेजवळ तैनात करेल.

धक्कादायक! पाकिस्तानात बकरीवर लैंगिक अत्याचार; संतप्त लोकांनी इम्रान खान यांच्याकडे मागितला जाब

चीन या तिबेटियन तरुणांची निष्ठा चाचणी घेत आहे आणि नंतर त्यांना कठोर प्रशिक्षण देत आहे आणि त्यांना LAC वर तैनात करत आहे. चीन ज्या तिबेटींना आपल्या सैन्यात भरती करत आहे, ते सर्व चीनमध्ये राहतात. चिनी सैन्य तिबेटियन युवकांची भरती करत असल्याची गुप्त माहिती मिळाली आहे आणि एलएसीवर विशेष ऑपरेशनची तयारीही सुरू आहे, असे माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे.

जम्मू-काश्मीर : एकाच वेळी तीन ठिकाणी दिसली संशयास्पद ड्रोन्स; BSF ने केला गोळीबार

तिबेटियन सैनिकांना भरती दरम्यान विविध प्रकारच्या चाचण्यांमधून जावे लागत आहे. या अंतर्गत, सैनिकांना चिनी भाषा शिकण्यास सांगितले जात आहे, चीनच्या कम्युनिस्ट पक्षाला सर्वोच्च असल्याचे सांगितले जात आहे.