जम्मू-काश्मीरमधील अवंतीपोरामधील पंपोर भागातील मीज गाव येथे जवान व दहशतावाद्यांमध्ये सुरू झालेल्या चकमकीत, आतापर्यंत एका दहशतावद्याचा खात्मा करण्यात यश आले आहे. जवानांनी परिसरास वेढा दिलेला आहे. तर चकमकीच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही अफवा पसरू नये , यासाठी परिसरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आलेली आहे.

जवानांना दहशतवादी दडून बसल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार लष्कराच्या ५० आरआर, एसओजी आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने शोध मोहीम सुरू केली. दरम्यान, दहशतवाद्यांचा याची जाणीव होताच त्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. सुरूवातीस जवानांकडून दहशतवाद्यांना शरण येण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र तरी देखील दहशतवद्यांकडून गोळीबार सुरू राहिल्याने, जवानांनी त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. ज्यामध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा झाला. सद्यस्थितीस दोन्ही बाजूंनी गोळीबार बंद असल्याची माहिती मिळाली आहे.

या चकमकीबाबत जम्मू-काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह यांनी सांगितिले की, अवंतीपोरा पोलीस आणि लष्कराच्या जवानांनी काल रात्री हे ऑपरेशन सुरू केले होते. ज्या ठिकाणी दहशतवादी दडून बसले होते, ते ठिकाण मशीदीला लागून आहे. गोळीबारादरम्यान दहशतवादी मशीदीमध्ये घुसले असल्याचे दिसत आहे.