23 September 2020

News Flash

राफेल वाद: संपूर्ण परिच्छेद कसा चुकू शकतो, मल्लिकार्जुन खर्गेंचा सवाल

बोफोर्स आणि २ जी प्रकरणातही जेपीसी गठीत करण्यात आली होती. त्यामुळे राफेलचीही जेपीसीमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.

मल्लिकार्जुन खर्गे (संग्रहित छायाचित्र)

राफेल प्रकरणी टायपिंगची चूक सुधारण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करण्यावरुन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. एका शब्दाची चूक समजू शकतो. पण इथे तर संपूर्ण परिच्छेदमध्येच गडबड आहे. संपूर्ण परिच्छेदात चूक होऊ शकत नाही, असे ते म्हणाले. खर्गे हे लोकलेखा समितीचे (पीएसी) अध्यक्ष ही आहेत.

आम्हाला राफेल व्यवहाराची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी हवी. जेव्हा संसदेचे सदस्य या विषयीच्या फाईल पाहतील, तेव्हाच याबाबतचे संपूर्ण सत्य समोर येईल, असे ते म्हणाले. तसेच बोफोर्स आणि २ जी प्रकरणातही जेपीसी गठीत करण्यात आली होती, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

ते म्हणाले, राफेलप्रकरणी सरकारच्या अहवालात टायपिंगची चूक कशी होऊ शकते ? जर ही चूक एका शब्दाची असती तर ठीक होते. पण संपूर्ण परिच्छेदमध्ये चूक कशी असू शकते, असा सवाल त्यांनी केला.

दरम्यान, केंद्राने शनिवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करत राफेल लढाऊ विमान कराराप्रकरणी न्यायालयाने दिलेल्या निकालातील परिच्छेदात दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. या परिच्छेदात नियंत्रक आणि महालेखा परिक्षक (कॅग) अहवाल आणि संसदेच्या पीएसीबाबतचा संदर्भ आहे.

राफेल व्यवहाराबाबत सरकारने घेतलेल्या निर्णयाबाबत संशय घेणे ठीक नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी म्हटले होते. या खंडपीठात सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. संजयकिशन कौल आणि न्या. के एम जोसेफ यांचा समावेश होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2018 3:21 pm

Web Title: one word it wouldve been understandable entire paragraph cant be a typo mallikarjun kharge on rafale
Next Stories
1 २०१९च्या निवडणुकीसाठी एनडीएच्या नेतृत्वात बदल होणार नाही : अमित शाह
2 मेरा भारत महान, मेरी मॅडम महान, सुषमा स्वराजांची भेट घेताना हमीदला अश्रू अनावर
3 योगी राजीनामा द्या, 83 निवृत्त अधिकाऱ्यांची मागणी
Just Now!
X