जम्मू काश्मीरच्या कठुआमध्ये ८ वर्षांच्या मुलीसोबत झालेल्या अमानुष अत्याचारप्रकरणी भाजच्या २ मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. मात्र, या प्रकरणी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष गुलाम मीर यांची वादग्रस्त वक्तव्ये अजूनही सुरुच आहेत. त्यांच्यावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी कधी कारवाई करणार असा सवाल त्यांनी केला आहे.

जावडेकर म्हणाले, राहुल गांधींद्वारे गुलाम मीर यांच्यावर कारवाई का केली जात नाही. जम्मू बार असोसिएशनचे प्रमुख जी. एन. आझाद हे पोलिंग एजंट होते. आझाद यांच्यावर कोणतीही जबाबदारी नाही का? त्यांनी देशाची माफी मागायला हवी.

जावडेकर म्हणाले, काल मी एका टिव्ही चॅनेलवर पाहिले की, राम नवमीनिमित्त काही लोक भगव्या कपड्यांमध्ये हातात तलवारी घेऊन दिल्लीच्या मशीदीबाहेर गोळा झाले होते. त्यानंतर त्यांनी भडकाऊ घोषणाबाजी केली. काही काळानंतर कळाले की ते आम आदमी पक्षाचे लोक होते. यांच्याद्वारा परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

काँग्रेस नेते गुलाम मीर यांनी कठुआ प्रकरणी म्हटले की, या घटनेचे खरे आरोपी बाहेर असून त्यांना वाचवले जात आहे. तसेच ज्यांच्यावर आरोप लावण्यात आले आहेत ते देखील दोषीच आहेत, असे मीर यांनी म्हटले होते.