07 August 2020

News Flash

भारतातील करोना रुग्णांचा रिकव्हरी रेट ५८ टक्के- डॉ. हर्षवर्धन

केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांची माहिती

संग्रहित छायाचित्र

भारतातील करोना रुग्णांचा रिकव्हरी रेट म्हणजेच रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे ५८ टक्के झाले आहे अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे. एवढंच नाही तर सध्याच्या घडीला साधारणतः देशभरातले तीन लाख रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर देशातील करोना रुग्णांचा मृत्यू दर हा ३ टक्के आहे, जे अत्यल्प आहे असंही हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे. तसंच रुग्ण दुप्पट होण्याचं प्रमाण म्हणजेच डबलिंग रेट हा १९ दिवसांवर पोहचला आहे. लॉकडाउनच्या आधी हे प्रमाण ३ दिवसांवर होते अशीही माहिती हर्षवर्धन यांनी दिली. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

भारतात सध्याच्या घडीला ५ लाख ८ हजार ९५३ करोना रुग्ण आहेत. यापैकी २ लाख ९५ हजार ८८० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर १ लाख ९७ हजार ३८७ रुग्ण हे अॅक्टिव्ह आहेत. आत्तापर्यंत करोनाची लागण होऊन देशभरात १५ हजार ६०० वर मृत्यू झाले आहेत.

आणखी वाचा- Coronavirus : जनतेच्या लढ्यामुळे इतर देशांच्या तुलनेत भारतात चांगली स्थिती – पंतप्रधान

देशात करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे वेगाने वाढते आहे. ही बाब भारतासाठी चांगलीच आहे. मागील २४ तासांमध्ये करोनाचे १० हजार २४५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आत्तापर्यंत ३ लाखांच्या आसपास रुग्ण देशभरात बरे झाले आहेत अशीही माहितीही हर्षवर्धन यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2020 2:34 pm

Web Title: our recovery rate has gone above 58 percent and around 3 lakh people have recovered from covid19 says union health minister dr harsh vardhan scj 81
टॅग Coronavirus
Next Stories
1 स्मृती इराणींवर टीका करताना शशांक भार्गव यांची जीभ घसरली
2 जम्मू-काश्मीर : नार्को टेरर मोड्युल उध्वस्त, दोघांना अटक
3 चीनच्या नऊ महिने आधी ‘या’ देशातील सांडपाण्यात आढळले होते करोना व्हायरसचे नमुने
Just Now!
X