News Flash

Oxygen shortage : “अफवा पसरवणाऱ्यांची संपत्ती जप्त करा”; मुख्यमंत्री योगींचे अधिकाऱ्यांना आदेश

काळाबाजार आणि साठेबाजी करणाऱ्यावर कडक कारवाई केली जाणार असल्याचेही सांगितले आहे.

(संग्रहित छायाचित्र)

देशात करोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने, दररोज लाखांच्या संख्येत नवीन करोनाबाधित आढळून येत आहे. परिणामी रूग्णालयांमध्ये बेड,ऑक्सिजन, व्हेंटीलेटर्स, रेमडेसिविर इंजेक्शनसह लसींचा तुटवाडा निर्माण झाल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांकडून केंद्रकाडे वारंवार मदत मागितली जात आहे. मात्र उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांना एक विशेष आदेश दिला आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथा यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना सोशल मीडियावर फेक न्यूज व अफवा पसरवून वातावरण खराब करणाऱ्यांची संपत्तीज जप्त करा आणि राष्ट्रीय सुरक्षा अधिनियमांतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
द हिंदू ने दिलेल्या बातमीनुसार, मुख्यमंत्री आदित्यानात यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत झालेल्या एक उच्चस्तरीय बैठकीत, औषधांचा काळाबाजार करणाऱ्यांवर व अफवा पसरवून वातावरण बिघडवण्यांचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात एनएसए आणि गँगस्टर अॅक्ट अंतर्गत कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, राज्यातील कोणत्याही कोविड रूग्णालयात ऑक्सिजनचा कुठलाही तुटवडा नाही. समस्या काळाबाजार आणि साठेबाजीची आहे, ज्या विरोधात कडक कारवाई केली जाईल. आम्ही आयआयटी कानपूर, आयआयएम लखनऊ आणि आयआयटी बीएचयू सोबत मिळून ऑक्सिजनचे एक ऑडिट करणार आहोत, जेणेकरून त्याची व्यस्थित देखरेख होऊ शकेल. प्रत्येक बाधित व्यक्तीस ऑक्सिजनची गरज लागत नाही, यासंबंधी जागृती करण्यासाठी माध्यमांकडून सहकार्याची अपेक्षा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 25, 2021 8:33 pm

Web Title: oxygen shortage seize the assets of who spread rumours cm yogi orders officers msr 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 हे खरं वसुधैव कुटुंबकम्! अमेरिकेपासून पाकिस्तानपर्यंत अनेक देशांचा भारताला मदतीसाठी पुढाकार!
2 “भित्र्या भारतीय सेलिब्रिटींनो, कुठे आहे तुमचा विकलेला आत्मा आणि ह्रदय?”
3 “ ‘सिस्टम’ फेल आहे…” म्हणत राहुल गांधींनी साधला मोदी सरकारवर निशाणा!
Just Now!
X