News Flash

पद्मश्री डॉ. केके अग्रवाल यांचे करोनामुळे निधन, लसीचे घेतले होते दोन्ही डोस

एम्समधील ट्रॉमा सेंटरमध्ये सुरू होते उपचार

इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि हार्ट केअर फाऊंडेशनचे प्रमुख पद्मश्री डॉ. केके अग्रवाल (वय 62) यांचे सोमवारी रात्री 11.30 च्या सुमारास करोना संसर्गामुळे निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांना एम्समधील ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल केले होते. तीन दिवसांपूर्वी प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरच्या आधारावर ठेवण्यात आले होते.

दोन महिन्यांपूर्वी डॉ. केके अग्रवाल यांनी करोना लसीचे दोन्ही डोस घेतले होते. परंतु गेल्या महिन्यात त्यांना संसर्ग झाला होता. अग्रवाल यांना करोना संसर्ग झाल्यानंतर एम्सच्या आयसीयूमध्ये दाखल केले होते. केके अग्रवाल यांनी 28 एप्रिल रोजी आपल्या ट्विटर अकाऊंटवर माहिती दिली होती की त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

डॉ.के.के.अग्रवाल हे त्यांच्या व्यवसायामुळे प्रसिद्ध होते. प्रत्येकाने करोना कालावधीत त्यांचा चांगुलपणा पाहिला. संकटाच्या वेळी त्यांनी हजारो लोकांना मदत केली. आर्थिकदृष्ट्या दुर्बल रूग्णांवर त्यांनी विनामूल्य उपचार केले. करोना संकटाच्यावेळी ते नेहमी वॉरियर्स म्हणून उभे राहिले, पण दुर्दैवाने त्याच करोनाबरोबर ते आयुष्याची लढाई हारले. २०१० साली अग्रवाल यांना पद्मश्री पुरस्काराने देखील गौरविण्यात आले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 18, 2021 9:25 am

Web Title: padma shri dr kk agarwal dies due to corona srk 94
टॅग : Corona,Coronavirus
Next Stories
1 करोना उपचारांमधून प्लाझ्मा थेरपीला वगळण्यात आलं; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
2 मुंबईत पेट्रोल शंभरीजवळ! जाणून घ्या आजचे ताजे दर
3 छोटी शहरं आणि ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था राम भरोसे; उच्च न्यायालयाने योगी सरकारला फटकारले
Just Now!
X