भारताचे होऊ घातलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी आवर्जून उपस्थित रहावे अशी शिफारस पाकिस्तानच्या विदेश मंत्रालयाने शरीफ यांच्याकडे केली आहे. त्यामुळे नवाझ शरीफ मोदींच्या शपथविधीसाठी उपस्थित राहण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
मोदींच्या शपथविधीला सलमान, अमिताभ आणि रजनीकांत यांना आमंत्रण
मोदींच्या शपथविधीला उपस्थित राहण्याची संधी सोडली, तर ही चूक ठरेल असे पाककिस्तानच्या विदेश मंत्रालयाने म्हटले आहे. त्यामुळे शपथविधी सोहळ्याला शरीफ यांनी आवर्जून जाण्याची शिफारस पाकिस्तानच्या विदेश मंत्रालयाने केली आहे. 
दोन्ही देशांतील पुढील काळातील संबंधांच्या दृष्टीने विचार करायला हवा आणि संबंधांना बळकटी येण्याची अशाप्रकारची संधी सोडता कामा नये असेही पाकच्या विदेश मंत्रालयाने शरीफ यांना केलेल्या शिफारशीमध्ये म्हटले आहे. मोदींच्या शपथविधीला जायचे की नाही यावरील अंतिम निर्णय पाकिस्तान सरकारकडून अद्याप घेण्यात आलेला नाही. तरीही पाकिस्तानच्या विदेश मंत्रालयाने केलेल्या शिफारशीवर नवाझ शरीफ काय भूमिका घेतात? आणि मोदींच्या शपथविधीला उपस्थित राहणार का? याकडे राजकीय अभ्यासकांचे लक्ष लागून राहीले आहे
भाजप कार्यकर्ते ‘याचि देही याचि डोळा’ शपथविधी सोहळा अनुभवणार