मोबाइल कंपन्यांकडून अनेकदा प्रेमकुंजन सेवा (लव्ह चॅट सव्‍‌र्हिस) पुरवली जाते. मात्र ही सेवा अनैतिक आणि गैर आहे, असे सांगून पाकिस्तान सरकारने त्यावर बंदी घातली आहे.
अनेक मोबाइल कंपन्या या सेवा पुरवण्यासाठी अनेक योजना आखतात. चॅटिंगचा दर कमी करणे किंवा रात्री उशिरापर्यंत चॅटिंग करण्यासाठी कमी दर, अशा प्रकारच्या योजना आखून मोबाइल कंपन्या बक्कळ पैसा कमावतात. मात्र मोबाइल कंपन्यांचे ऑपरेटरच विविध नावाने चॅटिंग करत असतात, असा आरोप प्राधिकरणाने केला आहे. मोबाइल कंपन्यांच्या या सेवांविरोधात अनेक तक्रारी आल्यानंतर ही बंदी घालण्यात आली आहे. ‘दिवसभरातील बराचसा वेळ वाया घालवणाऱ्या सर्व प्रकारच्या चॅट सेवा तात्काळ बंद कराव्यात,’ असे आदेश प्राधिकरणाने दिले आहे.